मुलगा असलो तरी चुकीला माफी नाही; काँग्रेसचे मुख्यमंत्री वडिलांविरोधात उभे ठाकले

मुख्यमंत्र्यांनी वडिलांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल, असे संकेत दिले आहेत.
No One Above Law says Chhattisgarh CM Bhupesh Baghel
No One Above Law says Chhattisgarh CM Bhupesh Baghel

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचे वडील नंद कुमार बघेल (Nand Kumar Baghel) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी नुकतेच उत्तर प्रदेशात ब्राम्हणांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर मुख्यमंत्र्यांनी वडिलांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल, असे संकेत दिले आहेत. (No One Above Law says Chhattisgarh CM Bhupesh Baghel)

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून भूपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांनीच अडचणीत आणलं आहे. लखनऊ येथे एका आंदोलनादरम्यान त्यांनी ब्राम्हण समाजाविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर राज्यात त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही थेट मुख्यमंत्री व काँग्रेसवर निशाणा साधाला. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर हे वक्तव्य काँग्रेसला महागात पडू शकते, असं मानलं जात आहे. 

त्यानंतर रविवारी नंद कुमार बघेल यांच्याविरोधात रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बघेल यांनी वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग ते माझे 86 वर्षांचे वडील असले तरी. छत्तीसगड सरकार सर्व जाती-धर्माचा, समाजाचा अन् त्यांच्या भावनांचा आदर करते. माझ्या वडिलांनी एका विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याने सामाजिक सलोखा बिघडला आहे. या वक्तव्यानं मीही निराश झालो आहे, असं मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितलं. 

आम्हा दोघांचे राजकीय विचार खूपच वेगळे आहेत. मी मुलाग म्हणून त्यांचा नेहमीच आदर करतो. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या चुकीवर पदडा टाकणार नाही. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असंही बघेल यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, नंद कुमार बघेल म्हणाले होते की, मी भारतातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करतो, ब्राम्हणांना तुमच्या गावात प्रवेश करू देऊ नका. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी मी इतर समाजाशीही चर्चा करेन. त्यांना वोल्गा नदीकिनारी पुन्हा पाठवण्याची गरज आहे. ते विदेशी असून इथे राहण्याच्या लायक नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते 86 वर्षांचे आहेत. 

बघेल यांच्या वक्तव्यावरून समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात छत्तीसगढमध्ये आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर रायपूरमधील डीडी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या वडिलांमध्ये सुरूवातीपासूनच वैचारिक मतभेद असल्याची चर्चाही छत्तीसगडमध्ये आहे. दरम्यान, थेट मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच त्यांच्याच राज्यात गुन्हा दाखल झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com