महिला IPS ची IAS केडरमधील पदावर बदली करत मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांना शह

मुख्यमंत्र्यांनी थेट गृह सचिवांकडून बदलीची फाईल मागवत आदेश काढला.
Kala Ramchandran
Kala Ramchandran

चंदीगड : भाजपची सत्ता असलेल्या हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) आणि गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एका महिला IPS अधिकाऱ्याची IAS केडरमधील पदावर बदली करण्यात आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. विज यांच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी बदलीचा निर्णय घेतल्यानं IAS लॉबीही नाराज झाल्याची जोरदार चर्चा आहे. (IPS officers transfer to IAS post despite Home Minister objection)

हरियाणा सरकारने रविवारी आयपीएस अधिकारी कला रामचंद्रन यांनी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही बदली केली आहे. दोन दिवसांपूर्वी विज यांनी या बदलीला विरोध केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी थेट गृह सचिवांकडून बदलीची फाईल मागवत आदेश काढला. त्यामुळे विज नाराज झाल्याची चर्चा आहे. 

विज यांनी रामचंद्रन यांच्या बदलीच्या फाईलवर केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाची (DOPT) परवानगी आवश्यक असल्याचं लिहिलं होतं. तसेच या विभागाच्या आदेशाचं कारण देत त्यांनी कला रामचंद्रन यांना पद सोडण्यास नकार दिला होता. ही बाब माध्यमांमध्ये आल्यानंतर आयएएस लॉबीही सक्रीय झाली. त्यांनी परिवहन सचिव पदावर आएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पण थेट मुख्यमंत्रीच या बदलीसाठी आग्रही होते. 

विज यांच्या म्हणण्यानुसार, इतर विभागांत कार्यरत आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या मुळ केडरमध्येच व्हायला हवी. तसेच राज्यातील आयएएस लॉबीकडूनही आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. पण त्याला उघडपणे कुणीही विरोध करताना दिसत नाही. अशाच एका प्रकरणात DOPT लेखी तक्रार करणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका हे पहिले अधिकारी होते. 

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बदलीचे समर्थन करण्यात आले आहे. प्रधान सचिवांची एकूण बारा पदे आहे. त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत, असं कारण कार्यालयानं दिलं आहे. हरियाणा सरकारकडून आयएसए केडर नियमांचं उल्लंघन होत असल्यानं आधीपासूनच केंद्र सरकारची नाराजी आहे. यापूर्वीही काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या आयएएस केडरमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांसाठी DOPT ची मान्यता आवश्यक असूनही तशी परवानगी घेण्यात आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com