काँग्रेसचा यु-टर्न; सोनिया गांधी वाढवणार ममता बॅनर्जी यांचं टेन्शन?

काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेण्यात आली होती. पण आता त्यावरून यु-टर्न घेण्यात आला आहे.
AICC will take the final decision of contesting bhownipore election
AICC will take the final decision of contesting bhownipore election

कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भवानीपूर मतदारसंघातून खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपकडूनही तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण काँग्रेसनं उमेदवार देण्यावरून यु-टर्न घेतल्यानं पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम वाढला आहे. (AICC will take the final decision of contesting bhownipore election)

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगला भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रीपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. यावेळीही त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे.

काँग्रेस व डाव्या पक्षांकडून मात्र अद्याप उमेदवार देण्याबाबत निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेण्यात आली होती. पण आता त्यावरून यु-टर्न घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी म्हणाले, ते माझं वैयक्तिक मतं होतं. मुख्यमंत्र्यांविरोधात चांगल्या भावनेतून उमेदवार देऊ नये, असं मला वाटत होतं. पण आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यावर नव्याने विचार करावा लागेल. पक्षाकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं चौधरी म्हणाले आहेत. 

चौधरी यांच्या वक्तव्यामुळं आता ममता बॅनर्जी यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही, याचा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाच घ्यावा लागणार आहे. पण सध्याच्या स्थितीत त्यांच्याकडून उमेदवार दिला जाणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेत भाजपविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. या बैठकीला ममतादीदीही उपस्थित होत्या. तसेच ममतांनीही संसद अधिवेशनादरम्यान सोनिया गांधीची भेट घेतली होती. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार अद्याप ठरला नसला तरी सुवेंद्र अधिकारी यांनी उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 'नंदीग्रामध्ये यायला तुम्हाला (ममता बॅनर्जी) कुणी सांगितलं होतं? आता जर पक्षानं मला निवडणूक लढण्यासाठी सांगितलं तर काय घडेल? मी त्यांचा 1956 मतांनी पराभव केला आहे,' असं वक्तव्य अधिकारी यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे भाजपकडून ममतांविरोधात पुन्हा अधिकारी यांनाच उतरवलं जाणार का, या प्रश्नानं बंगालमधील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळं भाजपकडून अधिकृतपणे उमेदवार जाहीर होईपर्यंत ही चर्चा सुरू राहणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समसेरगंज आणि जंगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी मतदान होईल. तर तीन ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सोमवारी (ता. 6) या निवडणुकीची अधिसुचना जारी होण्याची शक्यता आहे. इच्छूकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com