नारायण राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू अन् कुटूंबियांनी केले गंभीर आरोप

नारायण राणे लखनऊच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.
Narayan Ranes driver died due to heart attack in lucknow
Narayan Ranes driver died due to heart attack in lucknow

लखनऊ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाहनावर ड्यूटीवर असलेल्या चालकाचा हृदयविकासाच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुटूंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. वैद्यकीय सुट्टीवर असतानाही त्यांना कामावर बोलावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. (Narayan Ranes driver died due to heart attack in lucknow)

नारायण राणे रविवारी लखनऊच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. अशोक कुमार वर्मा असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. ते राज्य स्थावर विभागात चालक या पदावर नियुक्त होते. राणे लखनऊ दौऱ्यावर आल्यानंतर वर्मा यांची ड्यूटीही लावण्यात आली. यादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला. 

कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार, अशोक कुमार यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते. पण नारायण राणे आल्यानंतर त्यांची रजा रद्द करण्यात आली. त्यांना जबरदस्तीने कामावर बोलावण्यात आले. स्थावर विभागातील अधिकारी अमरीश श्रीवास्तव यांना अशोक कुमार यांच्या तब्बेतीविषयी माहिती होते. त्यानंतरही कामावर हजर राहण्यास सांगितले. तसेच त्यांनी निलंबित करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे अशोक कुमार यांना कामावर जावं लागलं, असा आरोप कुटूंबियांनी केला आहे. 

हजरतगंजचे सहायक पोलिस आयुक्त राघवेंद्र मिश्र यांनी सांगितले की, अशोक कुमार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. कुटूंबियांनी हत्येचा आरोप केला असून तशी तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. शवविच्छेदन अहवालानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com