गणराया माझ्यावर आलेले संकट नक्कीच दूर करेल, मी वाईट काम केलेलं नाही

लाडक्या बाप्पाकडून मला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळते
011anilParab_110520_0.jpg
011anilParab_110520_0.jpg

सिंधुदुर्ग : राजकीय मंडळींनीही आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. शिवसेनेचे नेते, परिवहनमंत्री अनिल परब यांनी हे कणकवली तालुक्यातील हरकुळ या त्यांच्या मूळ गावी बाप्पाच्या उत्सवासाठी आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी आज साध्या पध्दतीने बाप्पाचे स्वागत केले. 

''गणराया माझ्यावर आलेले संकट नक्की दूर करेल लाडक्या बाप्पाकडून मला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळते,'' असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. अनिल परब म्हणाले की, मी दरवषी येतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. मला चांगले काम करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करीत असतो. मी कोणतेही वाईट काम केलेले नाही त्यामुळे गणराया माझ्यावर आलेले संकट नक्कीच दूर करेल. 

ठाकरे सरकारची स्थिती गांधीजींच्या तीन माकडासारखी 
''मी दरवर्षीच गणरायाची आराधना करीत असतो. कोकणातील प्रत्येक माणूस गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी उत्सव साजरा करण्यासाठी घरी आपल्या गावी येत असतो. लाडक्या बाप्पाकडून मला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळते,'' असे परब म्हणाले. 

गणराया कोरोनाचं संकट कायमचं दूर करेल : मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होतेमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ''जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com