गडचिरोलीतील चकमकीत सी-60 पोलिस पथकाकडून  13 नक्षलवाद्यांना कंठस्नान .. - gadchiroli police naxals clash 13 naxalists killed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

गडचिरोलीतील चकमकीत सी-60 पोलिस पथकाकडून  13 नक्षलवाद्यांना कंठस्नान ..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 मे 2021

पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे.  पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे. Gadchiroli Encounter between the C60 unit of Maharashtra Police and Naxals

प्राथमिक माहितीनुसार नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-60 पोलीस पथकाने 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पोलिसांकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे या भागात शोधमोहिम आणि सुरु आहे.  हा संपूर्ण भाग छत्तीसगढच्या सीमेनजीक असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो. 

प्रियांका गांधींनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र..

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-60 पोलीस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते.
 
पोलिसांचे सी-60 च्या कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. त्यातच भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत असल्याची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. पण, सुदैवाने रॉकेटलाँचरच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नाही. यानंतरच पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवलं होतं. या अभियानाअंतर्गतच येथे गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे. 

सध्या या परिसरात तेंदू पत्ता संकलन केल जात आहे. येथील अर्थव्यवस्था तेंदू पत्ता संकलनावर अवलंबून आहे. नक्षलवादीच या किमती ठरवतात. याच किंमती ठरवण्यासाठीची बैठक नक्षलवाद्यांनी एका गावात बोलावली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी आखणी करत बैठक सुरु असताना दबा धरून बसून, त्यांनी ही कारवाई केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख