प्रियंका गांधींनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र..

रुग्णालयांच्या दरनिश्चितीतून जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहनप्रियंका गांधी यांनी केले.
13Priyanka_Adityanath.jpg
13Priyanka_Adityanath.jpg

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस, उत्तर प्रदेशाच्या प्रभारी प्रियंका गांधी  राज्यातील आरोग्य सुविधांबाबत राज्य सरकारचे वाभाडे काढणारे पत्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. आज आणखी एका पत्राद्वारे त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे.  त्यांनी म्हटले आहे, की आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली असताना महागड्या वैद्यकीय सेवांमुळे गरीब, मध्यमवर्गीयांवर आर्थिक संकट ओढवत आहे. priyanka gandhi wrote letter to up cm yogi adityanath gave suggestions

 
उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री विजय कश्यप यांच्या निधनानंतर राज्यातील कोरोना व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांच्या दरनिश्चितीतून जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन काँग्रेस सरचिटणीस   प्रियंका गांधी यांनी केले.

काँग्रेसकडून केंद्रातील मोदी सरकार तसेच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टीका केली जात आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये वारेमाप मूल्य आकारले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना अक्षरशः कर्ज काढावे लागत आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांचे मूल्य राज्य सरकारने ठरवून द्यावे, अशी मागणी   प्रियंका यांनी केली आहे.  

वाढीव वीजबिल, शैक्षणिक शुल्कवाढ, महागाई यासारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले आहे, की राज्यात स्मार्ट मिटरमुळे वाढीव वीजबिले येत आहेत. ऐन कोरोना सरकारने वीजबिले वाढवू नयेत, खाद्यतेल, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील कडाडल्या आहेत. यामध्ये हस्तक्षेप करून राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढीचाही भार सर्वसामान्यांवर पडण्याची शक्यता पाहता शुल्क आटोक्यात राहावे त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठीची उपाययोजना राज्य सरकारने करावी, लहान उद्योगांना त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना करात सवलत द्यावी आदी मागण्या प्रियंका यांनी केल्या आहेत. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com