माजी खासदार सुबोध मोहिते 'घड्याळ' बांधणार   - Former MP Subodh Mohite to join NCP   | Politics Marathi News - Sarkarnama

माजी खासदार सुबोध मोहिते 'घड्याळ' बांधणार  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 जून 2021

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे येथे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते हे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. Former MP Subodh Mohite to join NCP  

सुबोध मोहिते हे पहिल्यांदा शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही कारणांवरून खटके उडाले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र ते रामटेक मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा नशीब आजमावले पण तेथेही त्यांना यश आले नाही. त्यानंतर बराच कालावधी ते राजकारणापासून अलिप्त  होते. 

पण आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांनी सांगितले की, शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे येथे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी इतर राजकीय पक्षांमध्ये ही नशीब आजमावले, पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीला तेथेही वळण मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांनी अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जाते.

अजून नक्की नाही : सुबोध मोहिते 

सुबोध मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला कन्फर्मेशन मिळालेले नाही, मला तसा कॉल आल्यावर मी निर्णय घेणार आहे. 

खडसे विरूद्ध खडसे सामना रंगणार
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भारतीय जनता पक्षाचे ओबीसी नेतृत्व रिक्त आहे, त्यात आता खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आक्रमक झाल्या आहेत, अशा स्थितीत भाजपनेही त्यांचा सामना करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांचे नेतृत्व पुढे आणण्याची खेळी सुरू केली आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोबत त्यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर एकनाथ खडसे  आक्रमक आहेतच पण त्यांच्यापेक्षा रोहिणी खडसे भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध अधिक आक्रमक झाल्या आहेत. ट्विटरवर त्या राज्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख