निवडणुका संपल्या अन् मोदी सरकारचा इंधन दरवाढीचा दणका - Election results Fuel prices rise again after 18 days | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

निवडणुका संपल्या अन् मोदी सरकारचा इंधन दरवाढीचा दणका

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार रंगात येण्यापूर्वी देशात दररोज इंधन दरवाढ होत होती.

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील निवडणुका (Election) संपल्यानंतर मोदी सरकारने (PM Modi) जनतेच्या खिशात हात घालण्यास सुरूवात केली आहे. मागील 18 दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात (Fuel Prices) वाढ करण्यात आली नव्हती. निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने ही दक्षता घेतली होती. पण निवडणुकांचा निकाल (Election Results) लागल्यानंतर दोन दिवसांत इंधन दरवाढ करण्यास सुरूवात केली आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार रंगात येण्यापूर्वी देशात दररोज इंधन दरवाढ होत होती. त्याविरोधात विरोधकांनी रान उठवले होते. निवडणुक प्रचारातही हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात होता. काही राज्यांत पेट्रोलचे दर शंभरीपार गेल्याने  मोदी सरकार बॅकफूटवर गेले होते. त्यामुळे इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यात आला. निवडणुका पार पडेपर्यंत एकदाही दरवाढ झाली नाही.

हेही वाचा : आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी

अखेर निवडणुका संपल्यानंतर मोदी सरकारने संधी साधत 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ करण्यास सुरूवात केली आहे. इंधन कंपन्यांनी आजपासून पेट्रोलच्या दरात 12 ते 15 पैशांनी वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 15 ते 18 पैशांनी वाढले आहेत. 

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 90.55 रुपयांवरून पोहचले असून मुंबईत 96.95 रुपये झाले आहेत. मुंबईत पेट्रोल 12 पैशांनी महागले आहे. चेन्नईतही पेट्रोल 12 पैशांनी महागले असून 92.55 रुपयांवर पोहचले आहे. मुंबईतील डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली असून ते 87.98 रुपयांवर गेले आहेत. 

देशात इंधरवाढीमध्ये 15 एप्रिल रोजी शेवटची कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर 16 पैशांनी तर डिझेलचे दर 14 पैशांनी कमी झआले होते. त्याआधी सलग दोन आठवडे इंधन दरात सातत्याने वाढ होत होती. देशात 24 मार्चपासून पेट्रोलच्या दरात 77 पैशांची तर डिझेलच्या दरात 74 पैशांची घट झाली होती. तर 2021 मध्ये पेट्रोलचे दर 7.46 रुपये आणि डिझेलचे दर 7.60 रुपयांनी वाढले आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख