काल अजित पवारांच्या सीबीआय चौकशीचा ठराव अन् आज देशमुख 'ईडी'च्या रडारवर

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस व शिवसेनेकडून केला जात आहे.
ED raids Anil deshmukhs residence in Nagpur and Mumbai
ED raids Anil deshmukhs residence in Nagpur and Mumbai

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करावी, असा ठराव भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत गुरूवारी मंजूर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (ED raids Anil deshmukhs residence in Nagpur and Mumbai)

मागील काही महिन्यांत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह खासदार राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली होती. तर देशमुख यांच्या घरांवर ईडीने दोनदा छापे टाकले आहेत. भाजपकडून परब यांनाही सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजही आता देशमुख यांच्यानंतर परब यांचा क्रमांक असल्याचं वक्तव्य केलं आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गुरूवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार व अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर करण्यात आला. अनिल परब यांच्यावरही वसुली प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीनंतर पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस व शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपच्या ठरावामुळं पुढील काळात अजित पवार आणि अनिल परब यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आवळला आहे. नागपूर येथील घरावर ईडीने आज सकाळी पुन्हा छापा मारला. त्याचवेळी त्यांच्या मुंबईतील घरातही ईडीने झाडाझडती सुरू केल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ईडीकडून देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. तसेच सीबीआयकडून देशमुख यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. ईडीने यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरावर छापा टाकला होता. आता आज पुन्हा छापेमारी सुरू असून त्यात आता मुंबईतील घराचीही झाडाझडती सुरू केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com