जयश्री पाटलांनी अनिल देशमुखप्रकरणी ED दिले अनेक पुरावे..   - ed has recorded adv jayashree patil statement in anil deshmukh case | Politics Marathi News - Sarkarnama

जयश्री पाटलांनी अनिल देशमुखप्रकरणी ED दिले अनेक पुरावे..  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 मे 2021

जयश्री पाटील यांनी ईडीला सर्व पुरावे दिले असल्याचे समजते. 

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईसीआयआर दाखल केल्यानंतर काल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ED या प्रकरणातील तक्रारदार अॅड. जयश्री पाटील Jayshree Patil यांचा चार तास जबाब नोंदवला. ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे पाटील यांना पुन्हा बोलावले जाण्याची शक्यता आहे. ed has recorded adv jayashree patil statement in anil deshmukh case

अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटींच्या वसुली आरोप प्रकरणात काल ईडीने जयश्री पाटील यांना चैाकशीसाठी बोलावले होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी  तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निंलबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला महिन्याला शंभर कोटीचे वसुल करण्याचे टार्गेट दिलं होते, असा आरोप केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाचे चैाकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? नाना पटोलेंचा सवाल..

ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार जयश्री पाटील बुधवारी ईडी कार्यालयात दाखल झाल्या. चार तास त्यांचा जबाब नोंदवला गेला. त्या वेळी काही प्रश्नही ईडीकडून विचारण्यात आले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जयश्री पाटील यांनी ईडीला सर्व पुरावे दिले असल्याचे समजते. 

"मला ईडीने प्रश्न उत्तर स्वरुपात माहिती विचारली. ईडीच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. त्यांना अनेक पुरावे दिले आहेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्यांची माहिती दिली आहे," असं जयश्री पाटील यांनी सांगितले.  "मला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं जाणार आहे. जेव्हा बोलावलं जाईल, तेव्हा मी पुन्हा ईडीच्या कार्यालयात जाऊन ईडीला सहकार्य करणार आहे," असंही त्यांनी सांगितलं.
 
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यामार्फेत मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती.  जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे.  ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत . जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं आहे.  त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख