मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? नाना पटोलेंचा सवाल.. - Nana Patole question Narendra Modi is only the Prime Minister of Gujarat | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? नाना पटोलेंचा सवाल..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

'शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण'

मुंबई : 'शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण' असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी Narendra Modi वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे, असा आरोप कॅाग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोलें Nana Patoleयांनी केला आहे. Nana Patole question Narendra Modi is only the Prime Minister of Gujarat

दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. 

दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत.
 
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

तौते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत ? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. कोकणात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, नारळ, आंब्याच्या बागांसह मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेत आहेत. पंचनाम्याचे काम सुरु असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यात येईल. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख दौरे करून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मी स्वतःही उद्या गुरुवारी कोकणाच्या दौ-यावर जाणार असल्याचे  पटोले म्हणाले.    
 

चंद्रकांतदादांच्या मागणीला पटोलेंचा पाठिंबा..म्हणाले.."निवडणुका घ्या..." 
                                                                                  
 मुंबई : कॅाग्रेसचे टुलकिट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं काँग्रेसचं  षडयंत्र आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल व्यक्त केला. चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्या या विधानानंतर कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काल मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं होते. "चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल," असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले होते. 
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख