डॉक्टरांची भरती MPSC ऐवजी थेट आरोग्य विभागातून होणार 

सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे.
Doctors will be recruited directly from the health department : Valse Patil
Doctors will be recruited directly from the health department : Valse Patil

पुणे : कोरोना महामारीच्या काळात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा न झाल्याने डॉक्टरांची भरती प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता भासत आहे. पुढील काळात डॉक्टरांची भरती राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत न करता थेट आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. (Doctors will be recruited directly from the health department : Valse Patil)

आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या भरतीसंदर्भात सूतोवाच केले. या कार्यक्रमासएकमेकांचे कट्टर विरोधक असलेले वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र आले होते.

वळसे पाटील म्हणाले की, गोरगरीब जनता कोरोनाचा सामना करत असताना इतर आजारांवर उपचार मिळावेत, यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसेसची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयासाठी शासकीय पातळीसह लोकसहभागातून मदत झाली. त्यातून डायलिसेसची पाच युनिट उभारली आहेत. 

कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे, त्याचा मोठा धोका राज्याला आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. दोन वेळा डोस घेऊनही कोरोना होत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. लसीकरण आणि टेस्टिंगही वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही वळसे पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले.


बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार  

बैलगाडा मालकांवर आजपर्यत दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. गुन्हे मागे घेणार म्हणून आगामी काळात कोणीही कायदा हातात घेऊन बैलगाडा शर्यती भरवू नये, अशी सूचनाही त्यांनी बोलताना केली.  
 
म्हणाले की, राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यती झाल्या. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बैलगाडा शर्यतबाबत राजकारण करण्याची कोणाचीही भूमिका नाही. त्या सुरू व्हाव्यात, यासाठी सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. बैलगाडा शर्यतीच्या मर्यादा पाळून शर्यतीस परवानगी दिली होती. मात्र, बैलगाडा मालक त्याचे पालन करत नाहीत, त्यामुळे शर्यतींवर पुन्हा बंदी आली. सध्या हा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आहे. ते जोपर्यंत या प्रश्नावर निकाल देणार नाहीत, तोपर्यत शर्यतींवरील बंदी उठणार नाही.

आढळराव पाटील यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाबाबत वळसे पाटील म्हणाले की, एकत्र यायला काही नाही. मात्र, कोरोनाच्या नियमांमुळे गर्दी करायला नको. शेवटी आयोजकांवर गुन्हा दाखल होतो. आताही पहा ना किती गर्दी झालीय.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com