परमबीर सिंह यांच्यावर चौथा गुन्हा दाखल..आजारपणामुळं देशाबाहेर गेले!

महिनाभारापासून आजारपणामुळे परमबीर सिंहदेशाबाहेर गेल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Parambir Singh.jpg
Parambir Singh.jpg

मुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह parambir singh यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांच्यावर ४ था गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री गोरेगाव पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक विमल अग्रवाल यांची ही तक्रार दिली आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान परमबीर सिंह यांनी आपल्याकडून नऊ लाख रुपये वसुल केले, आणि दोन मोबाईल फोन त्यांनी घेतल्याचा आरोप विमल अग्रवाल यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिर सिंह याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ईडीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या सुट्टीवर गेलेले परमबिर सिंह मात्र अद्याप हजर न झाल्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. परमबीर हे त्याची नियुक्ती केलेल्या गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून काही दिवस हजर झाले आणि ५ मे रोजी सुट्टीवरही गेले. ते आजपर्यंत हजर झालेले नाहीत. ते महिनाभारापासून आजारपणामुळे देशाबाहेर गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांच्या चंदीगड येथील घराला कुलूप आहे. 

परमबीर सिंह यांच्या वकिलांनी ते चंदीगडमध्ये असल्याचे न्यायालयात सांगितले. तर आजारी असल्याचे सांगत परमबीर यांनी औषध उपचाराची कागदपत्रेही पाठवली आहेत. दरम्यान मोहरम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड याची नियुक्ती महत्वाची असते. मात्र, त्या संबधित गृहरक्षक दलाची जबाबदारी ही परमबीर सिंहवर असल्याने ते सुट्टीवर होते. त्यामुळे त्याविभागाचा चार्ज हा के व्यंकटेशम यांच्यावर सोपवला होता. तीन ते चार महिने परमबीर  सिंह हे सुट्टीवरअसल्याने गृहविभागाकडून परमबीर सिंह यांना दोन वेळा पत्र पाठवून विचारणा केली. मात्र परमबीर यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेलं नाही. परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्याशी संपर्क होत नसल्याने लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.   

वाझेला रोज दोन कोटीचं टार्गेट..पालिका कंत्राटदारांनाही केलं होतं लक्ष्य 
मुंबई : निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे sachin waje याला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांनी दररोज दोन कोटीचे कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा या प्रकरणातील तक्रारदारांने केला आहे. कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने हे नुकसान भरुन काढण्यासाठी वाझेने महापालिकेतील कंत्राटदारांनाही वाझेने लक्ष्य केलं असल्याचे तक्रारदारांने तपासात सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com