वाझेला रोज दोन कोटीचं टार्गेट..पालिका कंत्राटदारांनाही केलं होतं लक्ष्य 

७५ टक्के परमबीर सिंह यांना तर २५ टक्के रक्कम वाटून घेण्याचे त्यांचे ठरले होते.
0nia13waze.jpg
0nia13waze.jpg

मुंबई : निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे sachin waje याला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांनी दररोज दोन कोटीचे कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा या प्रकरणातील तक्रारदारांने केला आहे. कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने हे नुकसान भरुन काढण्यासाठी वाझेने महापालिकेतील कंत्राटदारांनाही वाझेने लक्ष्य केलं असल्याचे तक्रारदारांने तपासात सांगितले आहे. 
 
आघाडी सरकार त्याच्या कर्माने पडेल! 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे. हिरेन हत्येप्रकरणी निलंबितपोलिस अधिकारी सचिन वाझे,  माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची चैाकशी सुरु आहे.  

‘ईडी’कडूनही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. सचिन वाझे प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. एका तक्रारदाराच्या जबाबातून सचिन वाझेचा १ नंबर बॉस हा दुसरा तिसरा कुणी नसून परमबीर सिंगचं असल्याचे तपासात समोर आले आहे.  परमबीर सिंह हे मुंबईचे पोलिस आयुक्त झाल्यानंतर हाँटेल कलेक्शन, बार कलेक्शन आणि बुकींना मदत असे अनेक व्यवसाय करण्याची हमी वाझेने त्यांना दिली असल्याचे तपासात आढळले आहेत. 

वाझे गुन्हे अन्वेषण विभागात रुजू होण्यापूर्वीच त्याची व्यापारी आणि बुकीसोबत बैठक झाली होती. 'हप्ता दिल्यास दुबईला जाण्याची गरज नाही,' असे त्यांने सांगितले होते. कोरोना काळातील नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेतील कंत्राटदारांनाही वाझेनं लक्ष केलं होतं. त्यांना दोन कोटीचं टार्गेट दिले होते. या वसुलीतून जमा झालेल्या रक्कमेतून ७५ टक्के परमबीर सिंह यांना तर २५ टक्के रक्कम वाटून घेण्याचे त्यांचे ठरले होते.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com