गणपतराव आबांना मतदान करता आले असते तर आनंद झाला असता : फडणवीस 

आबासाहेबांची विधानमंडळातील भाषणे ऐकून आमच्यासारख्या अनेकांना महाराष्ट्राचे प्रश्न समजले.
Devendra Fadnavis meet to family of Ganapatrao Deshmukh
Devendra Fadnavis meet to family of Ganapatrao Deshmukh

सांगोला (जि. सोलापूर) : ज्येष्ठ नेते गणपराव देशमुख ऊर्फ आबासाहेबांसारखी माणसे ही पक्षविरहीत आहेत. आबासाहेबांसारख्या पक्षविरहीत नेत्याला मतदान करता आले असते, तर मला आनंद झाला असता, असे भावनिक उद्‌गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्यात काढले. (Devendra Fadnavis meet to family of Ganapatrao Deshmukh)
    
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज मंगळवारी (ता. 17) देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्यात येऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी या वेळी मी राजकारणावर बोलणार नसल्याचे सांगितले. पण, आबासाहेबांसारख्या पक्षविरहीत नेत्याला मतदान करताना मला आनंद झाला असता, असे फडणवीस यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आबासाहेबांची विधानमंडळातील भाषणे ऐकून आमच्यासारख्या अनेकांना महाराष्ट्राचे प्रश्न समजले. आबासाहेबांची उंची व कर्तृत्व एवढे मोठे आहे की, त्यांनी विधानमंडळाच्या संस्थेची उंची वाढवली आहे. अशा महान, तत्वनिष्ठ व्यक्तीचा विधिमंडळाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभारण्यात यावा.

दुष्काळी भागातील लोकांचे दुःख जाणारा नेता, सामान्यासाठी सतत लढणारे आणि त्यांचे प्रश्न सोडविणारे नेते म्हणून गणपतराव देशमुख यांची ओळख होती. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. गणपतरावांच्या कार्याची खूप मोठी परंपरा आहे, त्यांच्या कार्यात त्यांना कुटुंबीयांनीही साथ दिली आहे. अशा तत्वनिष्ठ व्यक्तीचा विधानभवनाच्या आवारात स्मारकरुपी पुतळा उभा केला पाहिजे. त्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना असला तरी त्यांना भेटून स्मारक उभारणीची विनंती मी करणार आहे, असे फडणवीस या वेळी बोलताना म्हणाले. 

या भेटीवेळी (कै.) गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आबासाहेबांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत चव्हाण, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नानासाहेब लिगाडे, अभिजीत नलवडे, दत्ता टापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com