काही लोकांना वाटतं की मी दिल्लीला गेलो तर बला टळेल पण बला टळणार नाही! - Devendra Fadnavis gave the answer about going to the center | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

काही लोकांना वाटतं की मी दिल्लीला गेलो तर बला टळेल पण बला टळणार नाही!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

नरेंद्र मोदी जो आदेश देतील तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो.

नागपूर : विरोधापक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे केंद्रात जाणार अशी सध्या चर्चा आहे, याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ''माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही,'' असे फडणवीस यांनी सांगितले.  

फडणवीस म्हणाले की आमच्या पक्षात आमचे नेते नरेंद्र मोदी जो आदेश देतील तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो. पण एक गोष्ट सांगतो की, ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही. माझ्या शुभचिंतकांना आनंद होतो की, मला दिल्लीत काही मिळेल. पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही.

 विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीबाबत ते म्हणाले की,  निवडणुका जाहीर होऊ द्या. त्यानंतर भाजप आपली रणनिती समोर आणेल. पहिल्यांदा राज्य सरकारचा निर्णय समोर येऊ द्या. जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी निर्णय झाल्यावर आमची रणनिती समोर येईलच.  

पलांडेंचीकडे कबुली ; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ  
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे Sanjeev Palande व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने येत्या ६ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख