पलांडेंची कबुली ; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ  - Sanjeev Palande confession Anil Deshmukh difficulty increases | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पलांडेंची कबुली ; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये अनिल देशमुख  यांची भूमिका होती,

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे Sanjeev Palande व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने येत्या ६ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.  

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणी तपासात ‘ईडी’ने कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांना अटक केली होती. पोलिस अधिकारी सचिन वाझेला ओळखत नसल्याचे शिंदे यांनी ‘ईडी’ला सांगितले आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी ‘ईडी’ तांत्रिक तपास करत आहे. ‘ईडी’ने केलेल्या दाव्यानुसार, देशमुख यांची पोलिसांच्या विशेषकरून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भूमिका होती, असा जबाब पलांडे याने दिला आहे. या दोघांचा प्राप्तीकर परतावा व बँक खात्यांची तपासणी करत आहेत. त्यांचे उत्पन्न व त्यांच्याकडील मालमत्ता यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परमबीरसिंह यांनी लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी होता. पलांडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील मुखई येथील आहेत. त्यांचे वडील हे सूर्यकांत पलांडे हे माजी आमदार आहेत. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसमधून ते 1980 मध्ये आमदार झाले. अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पलांडे यांनी या आधीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांचा तेथील अनुभव पाहूनच देशमुखांनी त्यांना घेतले होते. परमबीरसिंह यांनी त्यांच्या आठ पानी पत्रात बऱ्याच वेळा पलांडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

‘ईडी’ आणखी काही पोलिसांचेही जबाब घेणार?
तपासात निष्पन्न झालेल्या नव्या माहितीसंदर्भात ‘ईडी’ आणखी काही जणांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काही पोलिसांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या मनातील नाव कोणते?  
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होणार आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख