यास च्रकीवादळ 'अम्फान'लाही मागे टाकणार! तीव्रता वाढण्याची भीती - Cyclone Yass likely to be more sever than Amphan | Politics Marathi News - Sarkarnama

यास च्रकीवादळ 'अम्फान'लाही मागे टाकणार! तीव्रता वाढण्याची भीती

वृत्तसंस्था
सोमवार, 24 मे 2021

मागील वर्षी याच कालावधीत अम्फानने पश्चिम बंगाल (West Bengal) व ओडिसामध्ये (Odisha) हाहाकार उडवला होता.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेले यास चक्रीवादळाने मागील वर्षीच्या अम्फान चक्रीवादळाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच कालावधीत अम्फानने पश्चिम बंगाल (West Bengal) व ओडिसामध्ये (Odisha) हाहाकार उडवला होता. जवळपास शंभर जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यास चक्रीवादळही तेवढ्याच तीव्रतेचे किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Cyclone Yaas likely to be more sever than Amphan)

तोक्ते (Tauktae cylone) चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, केरळ आदी राज्यांना जोरदार तडाखा दिला. त्यानंतर आता तेवढ्याच तीव्रतेचे यास हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंघावत आहे. हे वादळ तोक्ते व मागील वर्षीच्या अम्फान (Amphan Cyclone) एवढेच भयानक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २६ तारखेला हे वादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : अन् सरन्यायाधीश पोहचले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी

यास चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या दिवशी समुद्रात भरती आहे. चक्रीवादळ येण्याचा कालावधी आणि भरती कालावधी एकच असल्यास मोठ्या लाटा उसळू शकतात. किनारपट्टीलगत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहेत. वादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर ताशी १५५ ते १६५ किमी वेगाने वारे वाहू शकतात. हा वेग ताशी १८५ किमीपर्यंत वाढू शकतो. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, यास चक्रीवादळ अम्फानपेक्षा अधिक भयानक असू शकते. त्यामुळे बंगालमधील २० जिल्हयांमध्ये फटका बसेल. जीवितहानी होऊ नये, यासाठी सुमारे दहा लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. 

हवामान विभागाचे उप महाव्यवस्थापक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्याचे रुपांतर वादळात झाले आहे. सोमवारी (ता. २४) त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. त्याचे रुपांतर आणखी तीव्र वादळात होऊन पश्चिम बंगाल व ओरिसा किनारपट्टीवरील प्रदीप व सागर बेटांच्या दरम्यान धडकेल. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १८५ किमी एवढा राहील. हा वेग खूप नुकसानकारक आहे. तोक्ते आणि अम्फान या वादळांशी त्याची तुलना केली जाऊ शकते, असा इशारा मोहपात्रा यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख