लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांनी कुठलंही औषध घेऊ नये!

कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांनी इतर चाचण्या करण्याचीही गरज नसल्याचे सांगण्यात आलं आहे.
Covid patients without symptoms should not take any medicine says DGHS
Covid patients without symptoms should not take any medicine says DGHS

नवी दिल्ली : कोरोनाबाधित रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार लक्षणे नसलेले (Asymtomatic), सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणे अशा चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. या रुग्णांनी कोणती दक्षता घ्यावी, औषधांचा वापर, रुग्णालयात कधी दाखल व्हावे, याबाबत माहिती दिली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी कोणतंही औषध घेऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे. (Covid patients without symptoms should not take any medicine says DGHS)

केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालकांनी ही नियमावली प्रसिध्द केली आहे. त्यानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या यातील सर्व औषधे हटवण्यात आली आहेत. त्यामध्ये ताप, सर्दी-खोकल्याच्या औषधांचाही समावेश आहे. केवळ सहा मिनिटे चालण्याची चाचणी करण्यास सांगितले आहे. डॅाक्टरांशी ऑनलाईन संपर्क साधत घरी विलगीकरण करणे आवश्यक आहे. कोविडशी संबंधित कोणतीही औषधे नसली तरी इतर आजारांवर आधीपासून सुरू असलेली औषधे नियमितपणे घ्यावीत, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. 

कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांनी इतर चाचण्या करण्याचीही गरज नसल्याचे सांगण्यात आलं आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही काही ठराविक नियमित औषधे सुचवण्यात आली आहेत. इतर औषधे घेण्यास मनाई करण्यात आली आहे. रुग्णांमधील लक्षणे कमी होत नसतील किंवा वाढत असतील तरच इतर चाचण्या सुचवण्यात आल्या आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता, खोकण्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. 

सीटी स्कॅन करू नका; कॅन्सरचा धोका

लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी सीटी स्कॅन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सतत सीटी स्कॅन केल्यास भविष्यात कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात सीटी स्कॅन केल्यास दिशाभूल होऊ शकते. कारण या काळात अनेकांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झालेला नसतो. तसेच कोरोनाचे निदान करण्यासाठी सीसी स्कॅन करू नये. औषधोपचार करूनही रुग्णाची प्रकृती खालावत चालली असल्यासच स्कॅन करावे, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, रविवारी देशभरात नवीन एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. मागील दोन महिन्यांतील ही रुग्णसंख्या सर्वात कमी आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी 96 हजार 563 रुग्ण आढळून आले होते. मागील 24 तासांत 2 हजार 444 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही 45 दिवसांनंतर 2500 च्या खाली आला आहे. तसेच एका दिवसांत 1 लाख 73 हजार रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात सुमारे 14 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com