वादग्रस्त विधान केल्यानं संभाजी भिडे पुन्हा चर्चेत - corona is growing because ashadhi wari is denied permission sambhaji bhide | Politics Marathi News - Sarkarnama

वादग्रस्त विधान केल्यानं संभाजी भिडे पुन्हा चर्चेत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

पायी वारीला परवानगी द्या, अशी मागणी भिडे यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्यानं ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी त्यांनी अशी विधानं केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. पायी आषाढी वारी झाल्यास कोरोनाचा जगभरातून नायनाट होईल, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. corona is growing because ashadhi wari is denied permission sambhaji bhide

याबाबतचे निवेदन भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चैाधरी यांना दिले आहे. वाहनातून मानाच्या पालख्यांचे प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या पायी वारीला परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

संभाजी भिडे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हते तर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी.

यापूर्वी  संभाजी भिडे यांनी मास्कबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा उपाय शोधला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही, हा सगळा मूर्खपणा आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या.  

राज्यपाल हे भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागतात!
मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ''राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याचा सन्मानच आहे. पण राज्यपाल हे भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत,'' अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यपालांचे काम काय असते हे मला सांगायची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली जात आहे, हे सांगण्याचे काम भाजप करत आहे. राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख