राज्यपाल हे भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागतात!

राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-30T145151.045.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-30T145151.045.jpg

मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ''राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याचा सन्मानच आहे. पण राज्यपाल हे भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत,'' अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.  

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यपालांचे काम काय असते हे मला सांगायची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली जात आहे, हे सांगण्याचे काम भाजप करत आहे. राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे.

''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली. या भेटीत अधिवेशन आणि अन्य विषयांवर चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नाराजी नाही,'' असे नाना पटोले यांनी सांगितले.  

''काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. येत्या 5 तारखेला विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे. मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही. जी जबादारी मिळेल ती  स्वीकारणार आहे. माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही.," असे पटोलें म्हणाले. कोणी स्वबळावर कुठे लढत आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही स्वबळाची नारा आधीच दिला आहे.  केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत, असेही पटोलें म्हणाले.  

नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविला! 
नवी दिल्ली :  नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांचा कार्यकाल एक वर्षासाठी केंद्र सरकारने वाढविला आहे. सरकारने तिसऱ्यांदा कांत यांचा कार्यकाळ वाढविला आहे. आता अमिताभ कांत हे जून २०२२ पर्यंत नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहतील. केंद्र सरकारने याबाबत त्यांना पत्र दिले आहे. मंत्रीमंडळाने नियुक्ती केलेल्या समितीने अमिताभ कांत यांचा कार्यकाळ एका वर्षांसाठी वाढविण्यास मंजूरी दिली असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. 

 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com