स्वबळावर निवडणुका लढवण्याची नाना पटोलेंची भूमिका योग्यच.. - congress will be going solo in maharashtra assembly polls nana-patole Naseem Khan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

स्वबळावर निवडणुका लढवण्याची नाना पटोलेंची भूमिका योग्यच..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

नाना पटोले यांची भूमिका रास्तच आहे

मुंबई :  "महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत, ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन असल्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटलं आहे.congress will be going solo in maharashtra assembly polls nana-patole Naseem Khan

नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असे नसीम खान म्हणाले.

काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे, असेही नसीम खान म्हणाले.  स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुरासह विधानसभा निवडणुकी स्वबळावर लढविणार असल्याचे मत नाना पटोले नुकतेच व्यक्त केले आहे, यावर नसीम खान यांनी आपली भूमिका मांडली आहे.  

"कृष्णकुंज" फुलांनी सजले..मनसे 53 हजार पुस्तके भेट देणार..  

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा Raj Thackeray Birthday आज ५३ वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज बंगल्याच्या (दादर) गेटवर मनसे कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली आहे. नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन राज ठाकरेंवर वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होते आहे. तर राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख