"कृष्णकुंज" फुलांनी सजले..मनसे 53 हजार पुस्तके भेट देणार.. - mns chief raj thackeray celebrating his 53rd birthday today krushnakunj | Politics Marathi News - Sarkarnama

"कृष्णकुंज" फुलांनी सजले..मनसे 53 हजार पुस्तके भेट देणार..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा Raj Thackeray Birthday आज ५३ वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज बंगल्याच्या (दादर) गेटवर मनसे कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली आहे. नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन राज ठाकरेंवर वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होते आहे. तर राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. mns chief raj thackeray celebrating his 53rd birthday today krushnakunj

कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्रच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी टि्वटवर शेअर  केलं होतं. यात राज ठाकरे म्हणतात, "मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित रहा. कुटुंबीयांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं होऊ नये. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे" 

नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेला आहे. मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे.  

या पुस्तकांच्या यादीमध्ये ना. धों . महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व. पु. काळे, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग,श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व. पु. काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं , रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांची यादी आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख