काँग्रेसचं युवकांसाठी ‘डेटिंग डेस्टिनेशन’..

'जसे संस्कार तसेच काँग्रेसचं हे आश्वासन' असा टोला भाजपनं काँग्रेसला लगावला आहे.
congress17.jpg
congress17.jpg

वडोदरा : गुजरातमध्ये लवकरच सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेसने वडोदरा महापालिका निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. प्रेमी जोडप्यांना आरामात बसता यावं म्हणून खास आश्वासन काँग्रेसने दिले आहे. या आश्वासनामुळे खळबळ उडाली आहे.

यात युवकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने डेटिंग डेस्टिनेशन बनवण्याचं आश्वासन युवकांना दिलं आहे. त्यामुळे वडोदराचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या जाहीरनाम्यावर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'जसे संस्कार तसंच काँग्रेसचं हे आश्वासन' असल्याचा टोला भाजपनं काँग्रेसला लगावला आहे 

किरण बेदींना नायब राज्यपाल पदावरून हटवलं..सरकार अल्पमतात...?
 
जर काँग्रेस सत्तेत आली तर डेटिंग डेस्टिनेशन तयार केले जातील, असं आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात केलं आहे. ‘युवकांनाही आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. जे कँफे सेंटर होते ते सरकारने बंद केले आहेत. श्रीमंतांची मुलं कॅफे सेंटरमध्ये जाऊ शकतात. गरीब आणि मध्यमवर्गातील मुले कुठे जाणार? त्यामुळेच आम्ही सत्तेत आल्यास गरीब मुलांसाठी अशी जागा तयार करु जिथे ते आरामात बसू शकतील’, असं वडोदरा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पटेल यांनी जाहीरनाम्यात म्हटलं आहे. 

काँग्रेसनं हे आश्वासन राहुल गांधी यांनी सांगितल्यानंतरच दिलं असेल, असा टोलाही भाजपनं लगावला आहे. वडोदरा हे एक संस्कारी शहर आहे. इथं भाजपनं अनेक बाग फुलवल्या. त्यात लोकांचा फिटनेस आणि मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था केली आहे, असेही भाजपने म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com