किरण बेदींना नायब राज्यपाल पदावरून हटवलं..सरकार अल्पमतात...? - Politics puducherry kiran bedi removed as the lieutenant governor of puducherry | Politics Marathi News - Sarkarnama

किरण बेदींना नायब राज्यपाल पदावरून हटवलं..सरकार अल्पमतात...?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरून हटविण्यात आले आहे.

पुदुच्चेरीः पुदुच्चेरी येथे पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ होण्यास सुरवात झाली आहे. पुदुच्चेरीत येथे काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण पेटू लागले आहे. काल (मंगळवारी) रात्री किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरून हटविण्यात आले. राष्ट्रपतीभवनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पुदुच्चेरीत काँग्रेसचे सरकार आहे. मात्र, काँग्रेसचे आमदार ए जॉन कुमार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. कामराज नगरमधून पोटनिवडणुकीत २०१९ मध्ये ए जॉन कुमार हे निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँँग्रेस नेते राहुल गांधी उद्या पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत 

किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदावरून हटवल्यानंतर पुदुच्चेरीची जबाबदारी तेलंगणच्या राज्यपालांकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तेलंगणचे राज्यपाल टी. सुंदरराजन हे पुदुच्चेरीचे नायब राज्यपालही असतील. राष्ट्रपती भवनकडून ही माहिती दिली गेली आहे.

काल नायब राज्यपाल पदावरून हटविण्यात आलेल्या किरण बेदी यांनी आज टि्वट करीत पुदुच्चेरी येथील जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की माझ्या कार्यकालात ये सहभागी झाले त्या पुदुच्चेरी जनतेची व सरकारी अधिकाऱ्यांची मी आभारी आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. माझ्या कार्यकाळात सर्वांनी जनतेच्या सेवेसाठी मनापासून काम केले. पदुच्चेरीचे भविष्य़ उज्ज्वल आहे. हे आता सर्व जनतेच्या हाती आहे. 

किरण बेदी यांनी एक पत्र शेअर केले आहे. ज्यात त्यांनी एका डायरीचे कव्हर आहे. किरण बेदी आणि पदुच्चरेचे काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी याच्यात अनेक विषयांवरून वाद होता. काँग्रेसचे आमदार ए जॉन कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे. यात विरोधी पक्षांनी नारायणसामी यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या सरकारकडे बहुमत आहे, असे सांगत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पुढच्या काही महिन्यात येथे विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख