विमानतळावरुन श्रेयवाद नाही, आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही ; शिवसेनेचा राणेंना टोमणा

''विमानतळाबाबत आम्हाला श्रेयवादाच जायचे नसून सिंधुदुर्ग वासियांचे विमानतळाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
11Narayan_20Rane_20_20Vinayak_20Raut.jpg
11Narayan_20Rane_20_20Vinayak_20Raut.jpg

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील चिपी परूळे विमानतळाच्या उद्घाटनावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत पुन्हा जुंपली आहे. आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत Vinayak Raut,दीपक केसरकर, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 

''विमानतळाबाबत आम्हाला श्रेयवादाच जायचे नसून सिंधुदुर्ग वासियांचे विमानतळाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही, इतरांनी अॅलजी असू नये,'' असे सावंत यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता सांगितले.  ''हे विमानतळ पुर्ण होण्यासाठी नारायण राणे यांनीच सातत्याने पाठपुरावा केला असून याचे पूर्ण श्रेय हे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच Narayan Rane जाते, '' अशी फेसबुक पोष्ट नारायण राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश यांनी नुकतीच केली आहे. विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलविण्याची गरज नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर ते यु-टर्न घेत म्हणाले की, मुख्यमंत्री आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करु.  

विनायक राऊत म्हणाले की, विमानतळ हा श्रेयवादाचा विषय नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहोत आम्हाला यात श्रेयवाद नाही, पण जनतेचे समाधान हे आमचे श्रेय आहे. जनतचे आशीर्वाद जर आम्हाला मिळत असेल तर ती गणरायाची कृपा आहे.  कुडाळ, मालवण हा रस्ता चांगला झाला आहे. विमानतळाला चारही बाजूंनी रस्ता कसा चांगला मिळेल, याची जिल्हा प्रशासन काळजी घेत आहेत. उदय सामंत पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी ४० कोटीं निधा रस्ता दुरुस्तीचा केला आहे. १५ मे पासून पाऊस सुरु झाल्याने हा रस्ता होऊ शकला नाही. विमानतळ सुरू होण्यापासून रस्त्यांची डागडुजी होईल. 
 
उदय सामंत म्हणाले, ''हे विमानतळ सिंधुदुर्ग वासियांसाठी आहे, त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचीही अॅलर्जी नाही. त्यामुळे समोरच्यानाही अॅलर्जी नसावी, सिंधुदुर्गवासियांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणी यावं, कोण जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचा उद्धघाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मान्यवर येत आहेत. सिंधुदुर्गीच्या पर्यटनात भर पडणारा हा कार्यक्रम आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जगासमोर येईल. रोजगार निर्माण होईल. बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल.''  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com