भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला - BJP MLA Ramesh Jarakiholis supporters attacked State Congress chief DK Shivakumar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 28 मार्च 2021

अश्लील व्हिडिओप्रकरणी भाजप नेत्याला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. 

बेळगाव : अश्लील व्हिडिओप्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने कर्नाटकातील भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे कार्यकर्ते संतापले आहेत. या प्रकरणात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांचेही नाव समोर आले आहे.  त्यावरून भाजपने शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आज बेळगावच्या दौऱ्यावर शिवकुमार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर जारकीहोळी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील वातावरण चिघळू लागले आहे. 

माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. या अश्लील व्हिडिओतील तरुणीने आणखी व्हिडिओ जारी केला आहे. यात तिने मदत मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्या निवासस्थानी गेल्याचे म्हटले आहे. ते घरी नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. त्यावरून भाजप आक्रमक झाले आहे. सेक्स स्कँडलमध्ये शिवकुमार यांची नेमकी भूमिका काय, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.  

जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागल्याने दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी आज शिवकुमार यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. शिवकुमार हे आज बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. हे समजल्यानंतर ते जाणार असलेल्या मुख्य रस्त्यावर शिवकुमार यांचे अनेक कार्यकर्ते जमा झाले. शिवकुमार यांचा ताफा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी वाहनांवर हल्ला केला. यामध्ये काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असून हा हल्ला झाला आहे. 

हेही वाचा : शेतकऱ्यांची भाजप आमदाराला निर्वस्त्र करून मारहाण

दरम्यान, आपल्यावर झालेले आरोप शिवकुमार यांनी खोडून काढले आहेत. तरुणीला कधीही भेटलो नसल्याचे सांगत ते म्हणाले की,  त्या तरुणीने मला भेटण्याचा प्रयत्न केला असेल. ती मला भेटण्यासाठीही आली असेल पण आमची भेट झाली नाही. आम्ही सार्वजनिक आयुष्यात आहोत. राजकारण्यांकडे अनेक लोक समस्या घेऊन येत असतात. तुम्हाला रोज शेकडो लोक माझ्या घरी आणि कार्यालयात अडचणी घेऊन येताना दिसतील. 

या सेक्स स्कँडलमधील आरोपी नरेश गौडा याच्याशी ओळख असल्याचे मात्र, शिवकुमार यांनी कबूल केले आहे. ते म्हणाले की, मी नरेशला ओळखतो. तो माझ्या जवळचा आहे. त्याच्या घरीही मी अनेक वेळा गेलो आहे. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आम्ही भाजप नेत्यांवर काही काळ लक्ष ठेवून होतो. 

काय आहे प्रकरण?

जारकीहोळी यांनी एका तरुणीसोबत केलेले अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. जारकीहोळी यांनी धमकावून लैंगिक छळ केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. हे आरोप झाल्यानंतर जारकीहोळी यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कर्नाटक विधानसभेतही या मुद्यावरून मोठा गदारोळ झाला होता. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख