मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का ?..कोरोना न होताही  पालकमंत्री क्वारंटाईन..लाड यांचा टोला - BJP MLA Prasad Lad criticizes Chief Minister Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का ?..कोरोना न होताही  पालकमंत्री क्वारंटाईन..लाड यांचा टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 मे 2021

उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का ?

मुंबई  : "मुंबई-पुण्यातील कोरोनाच्या फैलावाचा दाखला सर्वच जण देत असताना वाईट अवस्था असलेल्या कोकणकडे मात्र सरकारचे Uddhav Thackeray दुर्लक्ष झाल्याचे जाणवते आहे. सिंधुदुर्ग - रत्नागिरीचे पालकमंत्री तर कोरोना न होताही क्वारंटाईन झाल्याची शंका येते आहे," असा सणसणीत टोला भाजप उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांनी लगावला आहे. BJP MLA Prasad Lad criticizes Chief Minister Thackeray
 
कोकणातील कोरोना रुग्णांना पुरेशा खाटाही नाहीत, असेही त्यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का ? त्यांनी आतापर्यंत कोकणच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक का घेतली नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. 

हेमंत सरमा मुख्यमंत्री झाले पण सोनावाल यांना भाजप वाऱ्यावर सोडणार नाही...

कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले ? मुंबईबाहेर शिवसेनेची वाढ सर्वप्रथम कोकणातच झाली. पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले आहेत, आजघडीला सिंधुदुर्गमध्ये 3,675 रुग्ण अॅक्टिव्ह असून केवळ 1,015 इतक्याच खाटा आहेत. तसेच रत्नागिरीत सध्या  7,772 रुग्ण उपचार घेत असून त्यांनाही खाटांची कमतरता भासत आहे.

कोरोना चाचण्यांबाबतही हीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र तरीही या जिल्ह्यांमध्ये ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावागावातील सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत, असा आरोपही लाड यांनी केला. दरम्यान, सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, सर्व खासदार - आमदारांसह निदान दृकश्राव्य माध्यमातून तरी बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख