हेमंत सरमा मुख्यमंत्री झाले पण सोनावाल यांना भाजप वाऱ्यावर सोडणार नाही.... - Hemant Sarma will be oath in as the Chief Minister of Assam today | Politics Marathi News - Sarkarnama

हेमंत सरमा मुख्यमंत्री झाले पण सोनावाल यांना भाजप वाऱ्यावर सोडणार नाही....

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 मे 2021

हेमंत बिस्मा सरमा हे २०१४ मध्ये कॅाग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आले होते.

नवी दिल्ली : कॅाग्रेसमध्ये असताना हेमंत बिस्मा सरमा Hemant Sarmaयांचे मुख्यमंत्रीपदाचे  Himanta Biswa Sarma oath ceremony अपूर्ण राहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे.  आज दुपारी ते आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  J.P. Naddaया कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले देशातील पूर्वकडील राज्याचे मुख्यमंत्री होणारे हेमंत बिस्मा सरमा हे तिसरे मुख्यमंत्री आहेत. मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशाचे भाजपचे मुख्यमंत्री हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. Hemant Sarma will be oath in as the Chief Minister of Assam today

हेमंत बिस्मा सरमा हे २०१४ मध्ये कॅाग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आले होते. ते काँग्रेसमध्ये असताना शिक्षणमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यांच्यासोबत ३८ आमदार होते. पण काँग्रेसपक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा हेमंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या विरोधात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या विजयानंतरही मुख्यमंत्री होऊ शकले नाही. पण आता २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री सोनोवाल यांच्या जागी हेमंत बिस्मा सरमा यांनी मुख्यमंत्री बनविण्यात येत आहेत. 

नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा  निवडणूकीत भाजपने  बहुमत मिळवून दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करीत आहेत.आसामचे मुख्यमंत्री  सर्वानंद सोनावाल  Sarvanand Sonawal आणि आरोग्य मंत्री हेमंत बिस्मा सरमा यांच्यात सीएम पदावरून रस्सीखेच सुरू होती. सोनोवाल  आणि हेमंत बिस्मा सरमा यांना  केंद्रीय नेतृत्वाने  दिल्लीत बोलावले होते.  काही दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शाह , भाजपचे  अध्यक्ष  जे.पी. नड्डा, भाजप संघटन महासचिव बी एल  संतोष  यांच्यात आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा  झाली.
  
आसाममध्ये कुणाला मुख्यमंत्री करायचे यावरून भाजप व्दिधा मनस्थितीत होता. मुख्यमंत्री सोनावाल यांना बाजूला करून हिमंत बिस्मा सरमा यांना मुख्यमंत्री करण्यात येईल, अशी चर्चा होती. पण सोनावाल यांना बाजूला सारले तर भविष्यात ते भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.  

"पक्ष विसरुन काम करा..सेवाकामाचे झेंडे लावू नका..." गडकरींचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला 

निवडूक प्रचारात मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर भाजपने दिले नव्हते. हिमंत बिस्वा सरमा यांच्या दबावामुळे हा मुद्दा भाजप टाळत आला आहे. सोनोवार व हिमंत बिस्वा सरमा या दोघांनीही आसाममध्ये भाजपला जनाधार मिळवून दिला आहे.  

हेमंत सरमांना मुख्यमंत्री केल्यानंतर सोनावाल यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यामागे 15 ते 20 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सोनावाल यांना टाळणे भाजपला शक्य होणार नाही. त्यासाठी आगामी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख