ठाकरे सरकारची ‘फटे लेकीन हटे नही’ची वृत्ती कौतुकास्पद!

चित्रा वाघ संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
20Sarkarnama_20Banner_20_202021_07_12T111137.332.jpg
20Sarkarnama_20Banner_20_202021_07_12T111137.332.jpg

पुणे  : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टि्वट करुन कॉग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये सव्वा तास चर्चा झाली आहे. राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली असल्याचे संजय राऊत यांनी बैठक झाल्यानंतर सांगितले आहे. राहुल गांधी यांचा राऊतांच्या खांद्यावर हात असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

MPSC Exam : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार 
या व्हिडिओत चित्रा वाघ म्हणतात की, सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा केंद्र सरकार बद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय.  मागील दोन वर्षात ठाकरे सरकारने  ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहितीचंय..खरोखरच आपली ‘फटे लेकीन हटे नही’ची वृत्ती खूपच कौतुकास्पद आहे. आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या दिल्लीच्या युवराजांना झाला असेल. म्हणूनच त्यांनी आपल्याला पाठीवर कौतुकाची थाप दिली.

चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या ‘फटे लेकीन हटे नही’चे दिलेली काही उदाहरणे 

  1. औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच- फटे लेकीन हटे नही  
  2. कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार- फटे लेकीन हटे नही
  3. MPSC च्या सर्व पदांची भरती ३१ जुलै पर्यंत करणार- फटे लेकीन हटे नही
  4. लॅाकडाऊन काळातील वीजबील माफ करणार- फटे लेकीन हटे नही
  5. जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य करणार - फटे लेकीन हटे नही 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत होते. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसनं स्वतंत्र लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यताआहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com