हवामान बदलावे तसे नाना पटोले बदलतात!

शेलार यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयावर सरकारवर टीकास्त्र सोडले.
Sarkarnama Banner - 2021-07-13T093220.383.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-13T093220.383.jpg

सांगली : ठाकरे सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनविले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित, सक्रिय रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण दुर्दैवाने महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, अशी जोरदार टीका भाजप आमदार आशिष शेलार Ashish Shelar,यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. पश्‍चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी कोरोना, लसीकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयावर सरकारवर टीकास्त्र सोडले. BJP leader Ashish Shelar criticizes Nana Patole

शेलार म्हणाले, ‘‘देशातील एकूण संख्येपैकी २० टक्के रुग्ण, २३ टक्के सक्रिय रुग्ण, ३० टक्के मृत्यू महारष्ट्रात आहेत. १ लाख २१ हजार ९४५ पैकी ६७ हजार २९६ मृत्यू महाराष्ट्रात आहेत. या संकटात ठाकरे सरकार कुठेही सकारात्मक दिसले नाही. पहिल्या लाटेत वैद्यकीय सेवा उभी करण्यात आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनपासून आवश्‍यक सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडले. देशात महाराष्ट्राला गालबोट लागले. ठाकरे सरकार रक्तपिपासू शक्ती आहे. शेतकरी प्रश्‍न, पीक विमा, कर्जमाफी, बोगस बियाण्यांची चौकशी, एमपीएसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, लटकलेले दहावी-बारावीचे विद्यार्थी यावर सरकार काहीच करत नाही. सगळा खेळखंडोबा सुरू आहे.’’

पटोलेंची पश्‍चात बुद्धी
आशिष शेलार म्हणाले, ‘‘नाना पटोले  Nana Patole नेहमीच विनोदी वाक्यरचना करत असतात. सभागृहात फोन टॅपिंगविषयी त्यांनी जी माहिती दिली ती त्यांनी काही तासांत बदलली. हवामान बदलावे तसे ते बदलतात. त्यांना पश्‍चात बुद्धी का होते, हे तपासावे लागेल.

चित्रकूट :  येथील दीनदयाळ शोध संस्थानच्या आरोग्यधाम परिसरात शुक्रवारपासून (ता. ९) सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक जबाबदारींमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार संघाच्या राजनैतिक संपर्काची जबाबदारी सहसरकार्यवाह अरुण कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघ व भारतीय जनता पक्ष यातील समन्वयाचे महत्त्वाचे काम या जबाबदारीत येते. याअगोदर ही जबाबदारी दुसरे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांच्याकडे होती.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com