बैलगाडा शर्यतीसाठी गोपीचंद पडळकर मैदानात

बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-14T123703.757.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-14T123703.757.jpg

मुंबई : राज्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या बंदीला झुगारुन आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी ठाकरे सरकारविरोधात Uddhav Thackeray एल्गार पुकारला आहे. पडळकरांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले. पडळकरांनी टि्वट करुन याबाबत माहिती दिली आहे. बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.


पडळकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा,शेतीमाती साठी एकत्र यावं लागणार आहे.. त्यामुळेच मी..... भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे दि. २० ॲागस्ट रोजी आयोजन केले आहे. तुमचं माझ्या गावी झरे,ता.आटपाडी, जि. सांगली येथे स्वागत आहे. या गोवंशाच्या आस्तित्वासाठी  आणि शेतकरी आस्मितेसाठी आपल्याला लढा द्यायचायं.

''गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव -माणसांच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल. देशी दुभते-दुधाळ जनावरं पाहायचे असतील, येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल,  तर गोवंश टिकवावा लागेल. गोवंश वाढवावा लागेल. यासाठी आपल्या ग्रामीण व्यवस्थेत एक आधीपासूनच व्यवस्था आहे. ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची. बैलगाडा शर्यतीमुळं शेतकरी सकस बैलाचं पोषण करतो, त्याला सांभाळतो. त्यामुळेच तर आपल्या भागात खिलार सारखा गोवंश वाढला. पण बैलगाडा शर्यतीवर बंदी आणून आपल्याला हा गोवंशच नामशेष करायचाय काय? तामिळनाडू सारखा अध्यादेश महाराष्ट्र सरकारला काढता येत नाही का?'' असा सवाल पडळकरांनी टि्वटमध्ये उपस्थित केला आहे. 

नाहीतर ईडी लावणार ; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकी 
मुंबई :  राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने निनावी फोनचे प्रकरण समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे Uddhav Thackeray स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांना व्हाँट्सअँपवर धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नार्वेकर या़ंनी ही बाब मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. नगराळे यांनी हे प्रकरण तपासासाठी मुंबईच्या गुन्हे शाखकडे सोपवलं आहे.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com