आमदाराच्या मेहुण्याला मारहाण : गुंडाला तीन वर्षांची सक्तमजुरी

संताजी खंडागळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भावशा याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
आमदाराच्या मेहुण्याला मारहाण : गुंडाला तीन वर्षांची सक्तमजुरी
3photo_10_may_ff.jpg

इस्लामपूर : तीन खून, खुनी हल्ला व चोरीचे गुन्हे दाखल असलेला गुंड भावशा ऊर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय २५) याला संताजी खंडागळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. चौगले यांनी सुनावली. भावशा हा सध्या खूनप्रकरणी कारागृहात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आमदार मानसिंगराव नाईक Mansingrao Naik यांचे मेहुणे संताजी खंडागळे Santaji Khandagale व संताजींचे वडील दादासाहेब रंगराव खंडागळे हे दोघे दुचाकीवरून शेतातून घरी जात होते. त्याचवेळी भावशा हा चुलता हिंदुराव पाटील यांच्यासोबत हातात गज आणि कुऱ्हाड घेऊन संताजी यांच्या आडवा आला. संताजी यांच्या चुलतीशी झालेल्या वादाची तक्रार केल्याचा याचा राग मनात धरून गजाने संताजी यांना मारहाण केली. 
अनिल देशमुख, मंदाकिनी खडसे आणि ईडी या तिघांसाठी बुधवार महत्वाचा!
याप्रकरणी भावशाविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक फौजदार एस. ए. शिंदे यांनी तपास केला. या गुन्ह्याची सुनावणी प्रलंबित असताना भावशाने संताजी खंडागळे यांचा नंतर २०१६ मध्ये घरात घुसून खून केला. नंतर संताजी यांचे वडील दादासाहेब यांचेही निधन झाले. दरम्यान, भावशाने गुन्ह्यात वापरलेली हत्यारे उपलब्ध होऊ शकली नव्हती.

गंभीर आणि महत्त्वाच्या खटल्यात साक्षीदार उपलब्ध न होणे आणि हत्यारे पुराव्याकामी न येणे अशा त्रुटींसह खटला न्यायालयात चालला. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी जोरदार युक्तिवाद करून या त्रुटी इतर पुराव्यांतून भरून काढल्या. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. त्यानुसार भावशाला दोषी ठरवून तीन वर्षांची सक्षम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, संदीप शेटे यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य मिळाले.
 
अट्टल गुन्हेगार भावशा
गुंड भावशा पाटील आणि संताजी खंडागळे यांच्यात १५ वर्षांपूर्वी धुसफूस झाली होती. तेव्हापासून भावशा सुडाने पेटला. २००५ मध्ये संताजी खंडागळे यांच्यावर पाईपने हल्ला केला. २००६ मध्ये मोहन पाटील यांच्यावर खुनी हल्ला केला. २०१० ला रेठरेधरणमध्ये मोहन पाटील यांचा मुलगा धनाजी यांचा खून केला. विटा येथील गुंड संजय कांबळे यांचा खून केला. प्रकाश पाटील यांच्यावर गोळीबार केला.

पलायन करून झारखंड गाठले. तेथून अटक करून न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांना हिसडा देऊन पलायन केले. कागल येथे यशवंत पाटील नावाने राहिला. टोळी बनवून त्यांच्या मदतीने रेठरेधरण येथे येऊन संताजी खंडागळे यांच्यावर गोळीबार करत पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. भावशावर तीन खून, खुनी हल्ला, सायकल चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत. यातील संताजीवरील हल्ला केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा काल झाली.  खुनासह इतर गुन्ह्यांची सुनावणी व निकाल प्रलंबित आहे.
 Edited by : Mangesh Mahale
 

Related Stories

No stories found.