अनिल परब, राऊतांच्या घरांवर दगडफेक

शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. सिंधुदुर्गातही पडसाद उमटले.
Sarkarnama (22).jpg
Sarkarnama (22).jpg

कणकवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे Narayan Rane यांना प्रथम अटक व नंतर जामीन मिळाला. या राजकीय घडामोडीचे परिणाम राज्यभर दिसले. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. सिंधुदुर्गातही पडसाद उमटले. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या हरकुळ खुर्द (ता. कणकवली) येथील बंद असलेल्या निवासस्थानी आणि खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव (ता. मालवण) येथील बंगल्यावर अज्ञाताने सोडा बॉटल, दगडफेकीचा प्रयत्न केला. Narayan Rane controversy
 
या पार्श्‍वभूमीवर मंत्री परब यांच्या मुळ गावी हरकुळ खुर्द येथील बंद घरावर अज्ञाताकडून हल्‍ल्याचा प्रयत्न झाला. घर बंद असल्याने हा प्रकार काल सकाळी स्थानिकांच्या लक्षात आला. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती परब यांनी देण्याचा प्रयत्न केला. फोंडाघाट पोलिसांनाही कळवण्यात आले. फोंडाघाट पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

दीडशे कोटीच्या थकबाकीमुळे भाजपचे आमदार कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्ती
खासदार राऊत यांच्या तळगाव येथील घरावर सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा येथील पोलिस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील तळगाव येथे खासदार राऊत यांचा बंगला आहे. रात्री उशिरा चार ते पाच व्यक्ती दुचाकीने तेथे आल्या. त्यांनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगड फेकले. सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. खासदार राऊत सध्या दिल्लीला आहेत. राऊत यांचे निकटवर्तीय नागेंद्र परब यांनी या घटनेला दुजोरा दिला. पोलिसांनी अज्ञातांचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. चार ते पाच दुचाकी स्वार असल्याचे परब यांनी सांगितले. या घटनेची माहिती दिल्ली येथे खासदार राऊत यांना देण्यात आली. रात्री उशिरा चार अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com