दीडशे कोटीच्या थकबाकीमुळे भाजपचे आमदार कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्ती

देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत केंद्र सरकारकडून कर्ज स्वरूपात ३५ कोटी ९४ लाख रूपयांचे साह्य केले होते.
Sarkarnama (21).jpg
Sarkarnama (21).jpg

दौंड : दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल Rahul Kul चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर Bhima Patas sugar factory पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली आहे. तीन वर्षापासून थकित असलेल्या १५० कोटी रूपयांच्या वसुलीसाठी तारण मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात Ramesh Thorat यांनी पत्रकार परिषदेते या बाबत माहिती दिली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे यावेळी उपस्थित होत्या.  
             
बॅंकेने भीमा सहकारी साखर कारखान्याला भांडवली कर्ज, मध्यम मुदत कर्ज व अन्य भांडवली कर्ज दिलेले आहे. परंतु परतफेड न झाल्याने एप्रिल २०१७ पासून कारखान्याचे संपूर्ण कर्ज हे अनुत्पादक कर्ज (नॅान परफॅार्मिंग अॅसेट) झाले असून बॅंकेला कारखान्याकडून १५० कोटी रूपये येणे आहे. कारखान्याकडील कर्ज अनुत्पादक झाल्याने जिल्हा बॅंकेचा एनपीए देखील १५ टक्क्यांवर गेला होता. २४ एप्रिल २०२० रोजी बॅंकेने वसुलीसाठी नोटीस दिल्यानंतर कारखान्याच्या वतीने चेअरमन तथा आमदार राहुल कुल व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यांनी साठ दिवसांची मुदत देण्याची विनंती केल्याने कारवाई झाली नाही. त्यानंतर देखील पाठपुरावा करूनही थकबाकी न भरल्याने बॅंकेने कर्जापोटी तारण दिलेल्या मालमत्तेची जप्तीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करून त्याविषयी २९ जुलै २०२१ रोजी कारखान्याला कळविले होते.
             
७ आँगस्ट २०२१ रोजी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी कारखान्याच्या तारण मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेले असता कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताबा दिला नाही. त्यामुळे बॅंकेने जप्तीची नोटीस डकवून तारण मालमत्तेचा प्रातिनिधिक ताबा घेतला आहे. दौंड तालुक्याचे आमदार म्हणून २०१९ मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले राहुल कुल हे सलग २० वर्षे कारखान्याचे चेअरमन आहेत. कारखान्याचे ४९०७१ सभासद आहेत.

केंद्राच्या सहकार्यानंतरही कारखाना बंद
सन २०१६ - २०१७ या हंगामात बंद पडलेला कारखाना सन २०१७ - २०१८ च्या हंगामासाठी सुरू करण्याकरीता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत केंद्र सरकारकडून कर्ज स्वरूपात ३५ कोटी ९४ लाख रूपयांचे साह्य केले होते. परंतु त्या हंगामानंतर कारखाना बंद आहे. 

 साखर आयुक्तालयाकडून लिलाव
भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता जून २०१८ मध्ये साखर आयुक्तांनी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्री केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com