रामदेव बाबांना उपरती; आधी अॅलोपॅथीवर टीका अन् आता केली महत्वाची घोषणा - After controversy Ramdev Baba now says he will take Covid19 vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

रामदेव बाबांना उपरती; आधी अॅलोपॅथीवर टीका अन् आता केली महत्वाची घोषणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वीच अॅलोपॅथीवर टीका केली होती.

नवी दिल्ली : अॅलोपॅथी (Allopathy) उपचार पध्दतीवर टीका करत योगगुरू रामदेव बाबा यांनी वाद ओढऴून घेतला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्या वक्तव्याचा देशभर निषेध केला. तर काही स्थानिक संघटनांनी त्यांच्याविरोधात न्यायालयातही मानहानीचा दावा दाखल केला. उच्च न्यायालयानेही त्यांना खडसावले. त्यानंतर आता रामदेव बाबांनी उपरती आली आहे. (After controversy Ramdev Baba now says he will take Covid19 vaccine)

रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वीच अॅलोपॅथीवर टीका केली होती. अॅलोपॅथीतील औषधे बोगस असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्षवर्धन यांनीही त्यांना आपले वक्तव्य घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर रामेदव बाबा यांनी आपला रोख या क्षेत्रातील माफियांकडे असल्याची सारवासारव केली. आता त्यांनी लवकरच कोरोना (Covid-19) प्रतिबंधात्मक लस घेणार असल्याचेही जाहीर केलं आहे.

हेही वाचा : अँटीबॅाडी कॅाकटेल गेमचेंजर ठरणार? डोस दिल्यानंतर दोन रुग्ण बारा तासांत घरी 

रामदेव बाबा म्हणाले, माझा लढा डॅाक्टरांविरोधात नसून औषध माफियांविरोधात आहे. मी कोरोना प्रतिबंधात्मक औषधांविरोधातही नाही. त्यामुळं लवकरच लसही घेणार आहे. योगा आणि आयुर्वेदाचा वापर करण्याबरोबरच प्रत्येकाने लस घ्यायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबा यांनी सुरूवातीला लसीलाही विरोध केला होता. पंतपधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मोफत लसीकरणाच्या घोषणेचेही रामदेव बाबा यांनी कौतुक केलं आहे. जागितक योग दिनादिवशीच या लसीकरण कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. 

दरम्यान, अँलोपॅथीवरुन सुरू असलेला वाद आता दिल्ली उच्च न्यायालायात गेला होता. रामदेव बाबा यांच्याविरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनने (DMA)याचिका दाखल केली होती. पंतजलीच्या कोरोनील बाबत रामदेव बाबांनी केलेल्या चुकीच्या दावा आणि अँलोपॅथीबाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत ही याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्चन्यायालयाने रामदेव बाबांना नोटीस बजावली होती. "कोरोनीलचा प्रचार करा पण अँलोपॅथीबाबत चुकीचे विधान करु नका," असे न्यायालयाने रामदेव बाबांना सुनावले होते.

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीत 'डीएमए'ला सांगितले की, न्यायालयात वेळ घालविण्याबाबत तुम्ही कोरोनाला रोखण्यासाठी संशोधन करण्यात वेळ घालवा. यावर डिएमएने न्यायालयात सांगितलं की कोरोनावर कोरोनील हे रामबाण उपाय असल्याचा रामदेव बाबा दावा करीत आहेत. यावर न्यायालयाने त्यांना सुनावले की तुम्हीच सांगितलं की कोरोनील बाबतचा दावा चुकीचा आहे, तर तुम्ही कशाला त्याचा विचार करता. कोरोनावर उपाय करण्यासाठी कोरोनील योग्य की अयोग्य हे वैद्यकीय तज्ज्ञ ठरवतील, आम्ही रामदेव बाबांच्या उत्पादनांवर बंदी घालू शकत नाही. रामदेव बाबांच्या मतानुसार त्यांच्या अँलोपॅथीवर विश्वास नाही, त्यांना योग आणि आयुवैद योग्य वाटते. हे चुकीचे किंवा बरोबरही असू शकते. अँलोपॅथी कुणासाठी चांगली किंवा वाईट ठरु शकते हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. आम्ही याबाबत रामदेव बाबांना नोटीस पाठवू शकतो पण  त्यांचा उत्पादनांवर बंदी घालू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटलं होतं.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख