मराठा आरक्षण मोर्च्यावरुन आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी आमने सामने.. -  Dispute between Vinayak Mete and District Collector Ravindra Jagtap over Maratha reservation Morcha | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षण मोर्च्यावरुन आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी आमने सामने..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

विनायक मेटे व नरेंद्र पाटील हे एकत्रित बीडमध्ये 5 जूनला मोर्चा काढत आहेत.

बीड  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (ता. ५) बीड शहरात, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यासह मराठा समाजातील विविध संघटना मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा कोरोनाच्या संकटामुळे उद्या न काढता पुढे ढकलावा, अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जगताप यांनी पत्रकार परिषदेत  दिली आहे. Dispute between Vinayak Mete and District Collector Ravindra Jagtap over Maratha reservation Morcha

दुसरीकडे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की , मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा तर निघणारच आहे . जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांना अडवू नका, अन्यथा ज्या ठिकाणी पोलिसांनी मराठा समाज बांधवांना अडवले आहे. त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. 

विजय मल्ल्याला मोठा झटका..बॅंका विकणार त्यांची जप्त केलेली संपत्ती..
 
मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे व भाजपाचे नेते नरेंद्र पाटील हे एकत्रित बीडमध्ये 5 जूनला मोर्चा काढत आहेत. यावरून बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व पोलिस अधिक्षक आर. राजा यांनी मोर्चाचे आयोजक यांच्याशी बोलणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले की, सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे 5 जून रोजी काढण्यात येणारा मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा पुढे ढकलावा व कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मोर्चा काढावा.

दरम्यान कोरोनाचे संकट अद्यापही जिल्ह्यामधील टळलेले नाही. त्यात विनायक मेटे हे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडं जिल्हा प्रशासनाकडून मोर्चा न काढण्यासाठी विनंती केली जात आहे. यामुळे या मोर्चा वरून आमदार विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख