विजय मल्ल्याला मोठा झटका..बॅंका विकणार त्याची जप्त केलेली संपत्ती.. - banks can sell vijay mallya properties shares worth rs 5646 crore to recover dues | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

विजय मल्ल्याला मोठा झटका..बॅंका विकणार त्याची जप्त केलेली संपत्ती..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

बॅंकांनी मल्ल्याला त्यांच्या किंगफिशर एअयलाइससाठी कर्ज दिले होते.

नवी दिल्ली : फरार मद्य उद्योजक विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष (पीएमएलए) न्यायालयाने त्याला दणका दिला आहे. त्यानुसार ईडीने जप्त केलेली त्याची 5 हजार 646 कोटींची मालमत्ता विकून थकीत कर्ज वसूल करण्यास न्यायालयाने बँकांना परवानगी दिली आहे. विजय मल्याने विविध बँकांचे तब्बल 9 हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्याने भारतातून पळ काढत परदेशात आश्रय घेतला आहे. banks can sell vijay mallya properties shares worth rs 5646 crore to recover dues

पीएमएलएच्या नुसार विजय मल्याची जप्त केलेली संपत्ती विकून बॅंकांनी घेतलेले कर्ज त्या रकमेतून वसूल करण्याचे आदेश दिले आहे. बॅंकानी मल्ल्याला त्यांच्या किंगफिशर एअयलाइससाठी कर्ज दिले होते. त्याने या कर्जाची परतफेड केली नाही. मल्ल्यावर आरोप आहे की त्याने ही कर्जाची रक्कम त्यांच्या अन्य गैरकामासाठी वापरली. तसेच कर्जाची रक्कम विदेशात पाठविली. 

  
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष (पीएमएलए) न्यायालयाने आठवडाभरात दोन आदेश देत त्याच्या आर्थिक साम्राज्याला सुरुंग लावला आहे. या आदेशानुसार मल्ल्याच्या ५ हजार ६४६ कोटी रुपयांच्या जप्त संपत्तीला विकून कर्जाची रक्कम काढून घेण्याची परवानगी संबधित बॅंकाना दिली आहे. मल्ल्यावर ६ हजार ९०० कोटी रुपयाचे कर्ज आहे. यात सर्वाधिक कर्जाची रक्कम स्टेट बॅक आँफ इंडियाची आहे. ही रक्कम १ हजार ६०० कोटी रुपये आहे. 

व्याजासह ही रक्कम आता ९ हजार कोटी रुपये झाली आहे. आता बॅक मल्याची संपत्ती विकून आपल्या कर्जाची रक्कम वसूल करु शकणार आहे. एसबीआय़सह अकरा बॅकांनी त्याला कर्ज दिले आहे. पंजाब नॅशनल बॅक, आयडीबीआय, बॅक आँफ इंडिया, बॅक आँफ बडोदा, सेंट्रल बॅक आँफ इंडिया आदी बॅंकानी मल्याला कर्ज दिले आहे. पीएमएलएच्या आदेशानंतर त्यांच्या वकीलांनी या निर्णयाला विरोध केला. पण या आदेशाला आव्हान देणारा कुठलाही दावा त्यांनी सादर केलेला नाही. फरार असलेला ६५ वर्षीय मल्ल्या एप्रिल २०१९ पासून ब्रिटनमध्ये जामीनावर आहे. ब्रिटिश कोर्टात त्यांच्यावर प्रत्यार्पणाचा प्रक्रिया सुरू आहे. 
Edited by : Mangesh Mahale    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख