पुरावा नसताना अनिल देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल -  CBI Filed a case against Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पुरावा नसताना अनिल देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 जून 2021

देशमुख यांची सार्वजनिकरित्या मानहानी झाली, असे देशमुख यांचे वकील ॲड. अमित देसाई म्हणाले.

मुंबई  :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या संबंधित एफआयआरमुळे राज्यातील संपूर्ण पोलिस दल नाखूष झाले आहे. कोणताही पुरावा नसताना सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असा दावा देशमुख यांच्या वतीने करण्यात आला. CBI Filed a case against Anil Deshmukh

सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर प्राथमिक चौकशी करून गुन्हा नोंदविला. पण त्यांच्याबाबत कोणताही पुरावा नाही, त्यामुळे या सर्व प्रकरणात देशमुख यांची सार्वजनिकरित्या मानहानी झाली, असे देशमुख यांचे वकील ॲड. अमित देसाई म्हणाले. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले. मात्र देशमुख यांच्याविरोधात एकानेही पैसे घेतल्याची फिर्याद केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. याउलट या पत्रातून असे वाटत आहे की, पोलीस आयुक्तालय परिसरातच यावर संशय व्यक्त होत आहे, असा उलट आरोप त्यांनी केला.

सीबीआय एफआयआर रद्द करण्याची मागणी देशमुख यांनी याचिकेत केली आहे. तसेच सीबीआय राजकीय कारणांमुळे आरोप करीत आहे, असाही आरोप केला आहे. या चौकशी करण्याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांनी देशमुख यांची बाजू ऐकून घेतली नाही, असा युक्तिवाद देसाई यांनी केला. याचिकेवर पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे.

काश्मिरमधील नेत्यांसोबत नरेंद्र मोदीची आज महत्वाची बैठक
नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काश्मिरी नेत्यांसोबत आज बैठक होत आहे. या बैठकीत कोणता निर्णय होणार याबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. या बैठकीसाठी आठ पक्षाच्या १४ नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.  काश्मीरमधील आगामी निवडणुकाबाबत चाचपणी करण्यासाठी हे मोदी पाऊल आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आजच्या बैठकीत या १४  नेत्यांनी पंतप्रधानांच्या भेटीसाठी जायचं नक्की केलं आहे. फारुक अब्दुला, उमर अब्दुला, गुलाम नबी आजाद, महेबुबा मुक्ती, निर्मल सिंह, कविंद्र गुप्ता, मुजफर बेग आदि नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख