काश्मिरमधील नेत्यांसोबत नरेंद्र मोदींची आज महत्वाची बैठक

फारुक अब्दुला, उमर अब्दुला, निर्मल सिंह, कविंद्र गुप्ता, बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
0Sarkarnama_20Banner_20_202021_04_20T220856.401.jpg
0Sarkarnama_20Banner_20_202021_04_20T220856.401.jpg

नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काश्मिरी नेत्यांसोबत आज बैठक होत आहे. या बैठकीत कोणता निर्णय होणार याबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. या बैठकीसाठी आठ पक्षाच्या १४ नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.  pm narendra modi meets jammu kashmir leaders in delhi today

काश्मीरमधील आगामी निवडणुकाबाबत चाचपणी करण्यासाठी हे मोदी पाऊल आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आजच्या बैठकीत या १४  नेत्यांनी पंतप्रधानांच्या भेटीसाठी जायचं नक्की केलं आहे. फारुक अब्दुला, उमर अब्दुला, गुलाम नबी आजाद, महेबुबा मुक्ती, निर्मल सिंह, कविंद्र गुप्ता, मुजफर बेग आदि नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

जम्मू काश्मिरमध्ये राजकीय प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. भाजप आणि पीडीची युती संपल्यानंतर २०१८ पासून येथे राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी त्यांनी संवाद साधला आहे. कोरोनानंतर येथे दहशतवादी कारवाया कमी झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे येथे पुन्हा राजकीय प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

योगींची डोकेदुखी वाढली; उपमुख्यमंत्री पदासाठी मित्रपक्षाचा भाजपला अल्टीमेटम
 लखनऊ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारची डोकेदुखी वाढतच चालली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी पक्षातील नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मित्रपक्षाकडून मागण्या वाढू लागल्या असून त्या मान्य न केल्यास युतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.  
विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे कामही भाजपला करावं लागत आहे. मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीने आता दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. आधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी आहे. काही आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने सातत्याने बैठका होत आहेत. आता निषाद पक्षाचे अध्यक्ष डॅा. संजय निषाद यांनीही भाजपला अल्टीमेटम दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com