मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांचे विचार काय आहेत? 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून आंदोलनाची सुरुवात झाली आहे.
Shahu Maharaj appeals MPs and MLAs to come together for maratha reservation
Shahu Maharaj appeals MPs and MLAs to come together for maratha reservation

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. पण अद्याप पंतप्रधानांचे याबाबतचे विचार समजले नाही. हे विचार समजले तरच आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल, असे वक्तव्य छत्रपती शाहू महाराज यांनी केलं आहे. (Shahu Maharaj appeals MPs and MLAs to come together for maratha reservation)  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. सकाळी अकरा वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून मूक आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी शाहू महाराजांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहचला आहे. आता हा आवाज दिल्लीपर्यंत न्यावा लागणार आहे आहे. पंतप्रधानांच्या पक्षाकडे बहुमत असून त्यांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न निश्चितपणे सुटेल.

दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न

जनतेमध्ये थोडी नाराजी निर्माण होत चालली आहे. एकमुखाने स्थिती हातळण्यापेक्षा विरोधात बोलण्याचा आणि समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. सौम्य पध्दतीने आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जायला हवे, यासाठी महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. आजचे आंदोलन ही त्याची सुरूवात असून हा आवाज आता मुंबईपर्यंत तर जाईलच पण दिल्लीपर्यंत नेण्यासाठी सर्वांचे लक्ष असले पाहिजे.

घटनेत दुरूस्ती करावी लागेल

रिव्हिव पिटीशन दाखल केली तर त्यात वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता एकच पर्याय आहे, केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. त्याची प्रक्रिया पार पाडायलला हवी. दोन तृतियांश खासदार व अधिकाधिक राज्यांना भक्कमपणे पाठिंबा देऊन नवीन कायदे आणल्याशिवाय चालणार नाही. घटनेत आजतागायत अनेक दुरूस्त्या झाल्या आहेत. मराठा समाजासाठी आणखी एक दुरुस्ती करायला काय हरकत आहे. त्यादृष्टीने पावले टाकत हा विषय पंतप्रधानांपर्यंत पुन्हा न्यायला हवा. आज बहूमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळं सर्व खासदार, आमदारांनी एकत्र येऊन दिल्लीपर्यंत आवाज पोहचवायला हवा, असे आवाहन शाहू महाराजांनी केलं.

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यापुढे जायला हवी

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. त्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. कोणत्याही समाजाच्या वाट्यातील आरक्षण घ्यायचे नाही, ही आपली सुरूवातीपासूनच भूमिका आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. त्यासाठी सर्व समाजांनी एकत्रित यायला हवे, असे शाहू महाराज म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com