लोणावळ्यात मिटिंग घेण्यापेक्षा मंत्रालयात बसून ओबीसींचे प्रश्न सोडवा

राष्ट्रवादी काँग्रेस ही ओबीसींच्या मुळावर उठली आहे.
Instead of holding a meeting in Lonavla, sit in the ministry and solve the problems of OBCs : Padalkar
Instead of holding a meeting in Lonavla, sit in the ministry and solve the problems of OBCs : Padalkar

सांगली  ः राष्ट्रवादी काँग्रेस ही ओबीसींच्या मुळावर उठली आहे. राज्य सरकारमध्ये जे ओबीसीचे नेते आहेत. ते नुसता बोलघेवडे आहेत. त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे. लोणावळ्यात मिटिंग घेण्यापेक्षा मंत्रालयात मिटिंग घेऊन समाजाचा प्रश्न सोडवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी केले. (Instead of holding a meeting in Lonavla, sit in the ministry and solve the problems of OBCs : Gopichand Padalkar)

आमदार पडळकर हे सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर वरील आरोप केला. ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याच्या केंद्रस्थांनी राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीचा अजेंडा हाच आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांच्या समाजाच्या मुळावर ते उठले आहेत. राष्ट्रवादी ही  शिवसेना आणि काँग्रेसची मदत घेऊन करत आहे. हे जनतेला आता कळले आहे.

ओबीसींचे जे नेते राज्य सरकारमध्ये आहेत, ते नुसता बोलघेवडे आहेत. त्यांचे सरकारमध्ये अजिबात काही चालत नाही. सत्तेमध्ये बसून तुम्ही मोर्चे काढत आहात. तुम्ही सत्तेतून बाहेर पडा आणि मगच मोर्च काढा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1951 ला ओबीसींसाठी आयोग नेमला जात नसल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काका कालेकर आयोग नेमण्यात आला होता. पण, आताचे ओबीसी नेते निर्णय घेत नाहीत, त्याचे कोणीही ऐकत नाहीत आणि ते सक्षम नाहीत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेत्यांवर केली. 
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सगळ्याची मागणी आहे. पण, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे, असेही आमदार पडळकर म्हणाले. 

महाराष्ट्रातील 346 जातीतील लोक ओबीसीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. आता कोण लोणावळा येथे मीटिंग घेत आहे, त्याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. मंत्र्यांनी लोणावळ्यात मिटिंग घेण्यापेक्षा मंत्रालयात मिटिंग घेऊन प्रश्न सोडवायला हवेत. लोणावळ्यात मिटिंग घेऊन त्यांचे राजकारण सुरू आहे, हे सुज्ञ जनतेला माहीत आहे, अशी टीकाही पडळकर यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com