प्रताप सरनाईकांच्या त्या आरोपाला राष्ट्रवादीच्या मुश्रीफांनी दिले उत्तर

महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी जोमाने काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतआहेत.
NCP leader Hasan Mushrif clarified the allegations in Pratap Saranaik's letter
NCP leader Hasan Mushrif clarified the allegations in Pratap Saranaik's letter

कोल्हापूर  ः शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामागे महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची भारतीय जनता पक्षाची खेळी असावी, अशी शंका राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शिवसेनेचे नेते फोडत असल्याचा आरोप सरनाईक यांनी या पत्रात केला आहे. मात्र, या आरोपाचे खंडन करत तीनही पक्ष एकत्रितरित्या काम करत असून राज्यात अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. (NCP leader Hasan Mushrif clarified the allegations in Pratap Saranaik's letter)

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भारतीय जनता पक्षाशी युती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरनाईक हे ईडी आणि सीबीआय यासारख्या केंद्रीय संस्थांकडून होणाऱ्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे त्रस्त आहेत. ते काही दिवस अज्ञातवासातही होते. मतदारसंघात त्यांच्या विरोधात पोस्टरबाजीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या पुढे आलेल्या या पत्राने राज्य ढवळून निघाले आहे. त्यावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत हसन मुश्रीफ बोलत होते. 

सरनाईक यांनी पत्रातून केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते फोडत असल्याचा आरोपाचे मुश्रीफ यांनी खंडन केले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या गोकूळ दूध संघात शिवसेनेचा प्रवेश करून घेत ६ संचालक निवडून आणले आहेत, असा दाखला मुश्रीफ यांनी दिला आहे. त्यामुळे उलट महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी जोमाने काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात कंगना रनोट व अर्णब गोस्वामी यांच्यावर आणलेल्या हक्कभंगानंतर भाजपने सरनाईक यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर यांनाही चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचे काम झाले. हा केवळ राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तो कधीही यशस्वी होणार नाही, असा ठाम विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बआधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनीही एक लेटरबॉम्ब टाकला होता. मात्र, अशा कोणत्याही लेटरबॉम्बद्वारे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोपर्यंत हे सरकार पाच वर्षेच काय, तर पंचवीस वर्षे टिकेल, असा दावाही मुश्रीफ यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com