फडणवीस माझे राजकीय गॉडफादर; माझ्या वेदना त्यांच्यासमोर मांडल्या 

मंत्रिपद देण्यास चालढकल करण्यात येत आहे, अशी खंतही त्यांनीबोलून दाखवली होती.
Devendra Fadnavis is my political godfather; My pain was presented to him: Ramesh Jarkiholi
Devendra Fadnavis is my political godfather; My pain was presented to him: Ramesh Jarkiholi

बंगळूर : ‘‘मी भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस म्हणजे बुडणारे जहाज आहे, त्यामुळे त्या पक्षात मी का जाऊ? भाजपने मला अत्यंत आदराने वागवले आहे. मी कधीही भाजपचा विश्वासघात करणार नाही. मी मुंबईला गेलो होतो, हे खरे आहे. देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गॉडफादर आहेत. मी माझ्या मनातील वेदना त्यांच्यासमोर मांडल्या आहेत,’’ अशी कबुली भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी फडणवीस यांच्या भेटीबाबत दिली. (Devendra Fadnavis is my political godfather; My pain was presented to him: Ramesh Jarkiholi)

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी ता. २५ जून रोजी म्हैसूर येथील सुत्तूर मठाच्या शिवरात्री देशी केंद्र स्वामींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या भेटीची कबुली दिली.

मागील आठवड्यात रमेश जारकीहोळी मुंबईला आले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी मंत्रिपदासाठी पक्षावर दबाव आणल्याची चर्चा होती. अश्लील चित्रफीत प्रकरणातून आपणास जाणीवपूर्वक बाहेर काढले जात नाही. मंत्रिपद देण्यास चालढकल करण्यात येत आहे, अशी खंतही त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवली होती. फडणवीस-जारकीहोळी भेटीची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात जोरदारपणे झाली होती. 

जारकीहोळी म्हणाले की, ‘‘स्वामीजींच्या जवळ येऊन मंत्रिपदासाठी दबाव आणण्याची वेळ माझ्यावर अजून आलेली नाही. स्वामींच्या मातोश्रींचे नुकतीच निधन झाले आहे. त्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी स्वामीजींची भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतले. भेटीवेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. दुसऱ्याला मंत्री करण्याची माझ्यात हिम्मत आहे, मग मी मंत्रिपदासाठी लॉबिंग का करेन? उलट आमदारपदही सोडून देण्याचा विचार मी सध्या करीत आहे. राजीनामा दिला तरी मी एकटाच देईन. पण, मी भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.’’  
 
आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय विचारपूर्वक

माझ्या मनाला ठेच पोचविणाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा जारकीहोळी यांनी दिला आहे. आमदारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय विचारपूर्वक करण्यात आला आहे. माझे बंधू आमदार असून आमच्या घराण्यात माझ्यापेक्षा दहापट वाघासारखी मुले आहेत. रमेश जारकीहोळी यांना संपवायचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही घरी पाठवू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. पक्षातील नेत्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का, यावर ते म्हणाले की, पक्ष, संघ परिवार आणि भाजप हायकमांडकडून आपल्याला चांगली वागणूक मिळत आहे. मात्र, काही जणांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला असून याबाबत पुढील दिवसांत सर्वकाही उघड करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com