South Solapur will not get Local MLA even for 50 years : Dr. Havinale
South Solapur will not get Local MLA even for 50 years : Dr. Havinale

दक्षिण सोलापूरला आगामी ५० वर्षे तरी भूमिपुत्र आमदार मिळणार नाही

सध्याच्या व नव्या नेतृत्वात मलातरी ती क्षमता दिसत नाही.

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यास आगामी किमान पन्नास वर्षे तरी भुमिपुत्र आमदार मिळणार नाही. सध्या असलेल्या व नव्या नेतृत्वात तालुक्‍याची आमदारकी मिळविण्याची क्षमता मला तरी दिसत नाही, असे खळबळजनक वक्तव्य दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. चनगोंडा हाविनाळे यांनी केले. (South Solapur will not get Local MLA even for 50 years : Dr. Havinale)

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या विकासाला चालना मिळाली आहे. या मतदार संघातील प्रत्येक गावांत त्यांनी भक्कम यंत्रणा निर्माण केली आहे, अशी माहितीही माजी सभापती डॉ. हाविनाळे यांनी दिली. 

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची 2009 च्या निवडणुकीपासून पुर्नरचना झालेली आहे. या पुर्नरचनेत आता तालुक्‍यातील ग्रामीण भागासोबच सोलापूर शहरातील मोठा भाग समाविष्ठ करण्यात आलेला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी 2014 आणि 2019 या पाच वर्षात काम करताना मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास 400 कोटींहून अधिक निधी आणला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात कधीच ऐवढे चांगले रस्ते नव्हते. आमदार देशमुख यांच्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील रस्ते मजबूत झाले आहेत, अशी माहितीही डॉ. हाविनाळे यांनी या वेळी बोलताना दिली.

हेही वाचा : मोहिते पाटलांची रणनीती यशस्वी झाली अन्‌ अकलूज ग्रामपंचायतीवर नगरपरिषदेचा बोर्ड झळकला
 
आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून वडापूर बॅरेजचा विषय मार्गी लागत आला आहे. या शिवाय भीमा-सीना जोड कालव्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. आता सिंचनाचा प्रश्‍नही मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. बॅरेज आणि जोड कालवा झाल्यास दक्षिण सोलापूर तालुक्‍याचे नंदनवन होईल, असा विश्‍वासही माजी सभापती डॉ. हाविनाळे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com