समाधान आवताडेंना शिवसेना जिल्हाप्रमुखाने बांधलेल्या ‘समर्थ बंधन’ची चर्चा - Discussion of Samarth Bandhan built by  Shiv Sena Ganesh Wankar to Samadhan Avtade | Politics Marathi News - Sarkarnama

समाधान आवताडेंना शिवसेना जिल्हाप्रमुखाने बांधलेल्या ‘समर्थ बंधन’ची चर्चा

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 7 मे 2021

या नेत्यांनी आवताडे यांना अप्रत्यक्ष मदत केली की काय? अशीही चर्चा आता रंगली आहे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या विजयासाठी अनेकांनी हातभार लावले असून ते अदृश्य हात आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आवताडे यांनी आमदारकीचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी 12 मार्च रोजी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर (Ganesh Wankar) आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे (Suresh Hasapure) होते. त्यावेळी वानकर यांनी आवताडे यांच्या हाती समर्थ बंधन बांधले होते. त्याची चर्चा आता सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. (Discussion of Samarth Bandhan built by  Shiv Sena Ganesh Wankar to Samadhan Avtade)

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके यांचे चिरंजीव भगिरथ यांना, तर भाजपकडून आवताडे यांना निवडणूक लढवली होती. त्यात आवताडे यांनी चुरशीच्या लढतीत 3733 मतांनी बाजी मारली.

तत्पूर्वी उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आवताडे, वानकर आणि हसापुरे हे स्वामी समर्थांच्या दर्शनाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये एकत्र आले हेाते. अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निमित्ताने आवताडे यांचा या भागात कायम संपर्क असतो. त्यामुळे आवताडे हे स्वामी समर्थांचे भक्त बनले आहेत. त्यामुळे त्यांचा या तालुक्याशी कायम संपर्क असतो.

हेही वाचा : मंत्रिपद नाकारल्याने नाराज असलेल्या सावंतांनी अखेर शिवसेना नेतृत्वाशी जुळवून घेतले

विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवानंतर पराभवाची हॅट्‌ट्रीक करण्यापेक्षा विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने समाधान आवताडे यांनी चंग बांधला होता. त्यादृष्टीने जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांना जवळ करण्याचादेखील प्रयत्न त्यांनी निवडणुकीपूर्वीच केला होता. त्यामध्ये काही त्यांच्या हाताला लागले, तर काही त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते. 

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी 12 मार्च रोजी आवताडे यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. या दर्शनाच्या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर व दक्षिण सोलापुरातील नेते आणि काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हेदेखील त्यांच्यासोबत होते. स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेचे वानकर यांनी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या समाधान आवताडे यांच्या हातात समर्थ बंधन बांधले. त्यानंतर समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आवताडे यांनी 3733 मताने विजय प्राप्त केला आणि लग्नाच्या वाढदिवशी आमदारकीचे स्वप्न पूर्ण केले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेले दर्शन आणि हातात बांधलेले समर्थ बंधन हे आवताडेंना फलदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

गणेश वानकर आणि सुरेश हसापुरे यांच्या माध्यमातून आवताडे यांनी शिवसेना आणि काँग्रेसची मते आपल्या बाजूने वळविली की काय? तसेच, या नेत्यांनी आवताडे यांना अप्रत्यक्ष मदत केली की काय? अशीही चर्चा आता रंगली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख