धवलसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकारातून नातेपुत्यात अखेर कोविड सेंटर सुरू 

परंतु भव्य अशी इमारत तालुक्यात कुठेही उपलब्ध होऊ शकली नव्हती.
Dhavalsinh Mohite Patil's initiative finally started Kovid Center in Natepute
Dhavalsinh Mohite Patil's initiative finally started Kovid Center in Natepute

नातेपुते (जि. सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या माळशिरस (Malshiras) तालुक्यातील कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोकनेते (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकारातून नातेपुते येथे आजपासून (ता. २५ मे) कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे 100 रूग्णांची सोय केली आहे. (Dhavalsinh Mohite Patil's initiative finally started Kovid Center in Natepute)

नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या भव्य इमारतीत हे कोविड सेंटर राज्य सरकारच्या वतीने आज सुरू करण्यात आलेले आहे. हे कोरोना सेंटर सुरू होण्यासाठी तहसीलदार जगदीश निंबाळकर, तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी विशेष प्रयत्न केले. 

वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यात अनेक सहकारी संस्था कार्यरत आहेत. तालुक्यासाठी दोन आमदार आहेत. परंतु कोविड सेंटर कोणीही सुरू केलेले नव्हते, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशेनमध्ये होते. कोरोना रुग्ण घरातच राहिल्यामुळे संपूर्ण घरच्या घरं कोरोनाने बाधित होत होते. त्यामुळे माळशिरस तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला अटकाव बसावा, यासाठी सरकारी पातळीवर कोवीड सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. परंतु भव्य अशी इमारत तालुक्यात कुठेही उपलब्ध होऊ शकली नव्हती. 

सरकारची ही अडचण लक्षात घेऊन लोकनेते (कै.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी तथा संस्थेच्या अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते-पाटील आणि डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी तालुक्याची गरज लक्षात घेऊन येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाची इमारत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

या ठिकाणी महिला आणि पुरुष कोरोना बाधित रुग्णांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाणार आहे. नाश्ता, टाॅवेल, साबण आदीही सेवा पुरवली जाणार आहे. या कोविड सेंटरमुळे परिसरातील कोविड रूग्णांना आता उपचारासाठी खासगी रुग्णालयात अथवा तालुक्याबाहेर जावे लागणार नाही, असे तलाठी प्रभाकर उन्हाळे आणि ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com