नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा : हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक  - Discussion of change of leadership in Karnataka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा : हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 मे 2021

हायकमांडच्या निर्णयाची त्यांना प्रतीक्षा आहे.

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) कोविड साथीच्या आजाराने थैमान घातलेले असतानाच नेतृत्व बदलाच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांचा मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. त्याबरोबर नेतृत्व बदलाची कुरबूर सुरू झाली आहे. (Discussion of change of leadership in Karnataka)
 
मंत्रिमंडळांतर्गत संघर्ष, सरकार आणि पक्ष यांच्यात वाढत असलेल्या दरीवरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये असंतोष आहे. राज्यातील नेतृत्वासाठी काही नेते आणि गट हायकमांडकडे आतापासूनच प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटकात नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतल्यास आपल्याच नावाचा विचार व्हावा, यासाठी काही नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरवात केली आहे. 

हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला ‘तगड्या’ उमेदवाराची गरज...

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गृहमंत्री बसवराज बोम्मई, मुरगेश निराणी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असून त्यांनी तशा हालचालीही सुरू केल्याचे समजते. यावर हायकमांडच्या निर्णयाची त्यांना प्रतीक्षा आहे. मात्र पक्षातील अधिकृत सूत्रांच्या मते, किमान कोरोना कमी होईपर्यंत नेतृत्वात बदल होण्याची शक्यता नाही. हायकमांड त्याला कोणत्याही परिस्थितीत अनुकूलता दर्शविणार नाही.

दिल्लीतील केंद्रीय नेत्यांशी सातत्याने संपर्कात असलेले भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. कोविड-१९ बरोबर झुंजण्यासाठी सरकार धडपडत असतानाच, कर्नाटकमधील भाजपला पक्षाचे आमदार आणि नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
 
येडियुरप्पांच्या मुलाच्या वाढत्या हस्तक्षेपाने कुरबुरी 

बी. एस. येडियुरप्पा हेच सध्या सरकार टिकवून ठेवण्यासाठी सर्वात उत्तम नेतृत्व आहे, अशी खात्री पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला खात्री आहे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकीत मंत्री एकमेकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर येडियुरप्पा यांचे वाढते वय, भ्रष्टाचार आणि त्यांचा मुलगा विजयेंद्र यांचा सरकारमधील वाढता हस्तक्षेप यावरून त्यांचे प्रतिस्पर्धी कुरबूर करीत आहेत. मात्र, येडियुरप्पांना पर्याय देण्याचे सामर्थ्य इच्छुक नेत्यांमध्ये नसल्याची केंद्रीय नेतृत्वाची भावना झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख