स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपला ‘तगड्या’ उमेदवाराची गरज...

ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला सर्वच दृष्टीने ‘तगडा’ उमेदवार द्यावा लागणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास बावनकुळे यांना उमेदवारी मिळवणे आणखीच अवघड ठरेल, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : भाजप सरकारच्या BJP Government कार्यकाळात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule ऊर्जावान मंत्री म्हणून नावारूपास आले. ती पाच वर्षांची कारकीर्द त्यांनी चांगलीच गाजवली. पण शेवटी शेवटी काय झाले कुणास ठाऊक? ज्या कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातून ते आरामात निवडून येण्याची खात्री आहे. तेव्हाच त्यांना वरिष्ठांना डच्चू दिला. याचे कारण मात्र अद्याप पुढे आले नाही. आता बावनकुळे चांगलेच सक्रिय झाले आहेत Now the Bawankuls is well activated आणि गिरीष व्यास Girish Vyas आमदार असलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. 

ज्या कारणासाठी कामठी विधानसभा मतदारसंघाची त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती ते प्रकरण अद्याप गुलदस्त्यात असल्याने सर्वच साशंक आहेत. भाजपच्या कार्यकाळात बावनकुळे पाच वर्षे ऊर्जामंत्री होते. याशिवाय अबकारी खाते देऊन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना करण्यात आले होते. भंडारा आणि वर्धा जिल्ह्याचेही काही वर्षे ते प्रभारी पालकमंत्री होते. भाजपचे ऊर्जावान मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही ते लोकप्रिय होते. कामठी विधानसभा मतदारसंघातून हमखास निवडून येण्याची त्यांची खात्री होती. सर्व काही आलबेल असताना त्यांचे वरिष्ठांसोबत बिनसले. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना प्रतीक्षा करायला लावली. 

शेवटचा एक तास शिल्लक असताना त्यांना डावलून टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली. बावनकुळे यांचे कोणासोबत बिनसले, त्यांचे तिकीट कोणी कापले, त्याची कारणे काय, हे अद्याप कुणालाच उमगले नाही. स्वतः बावनकुळे या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. अदानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेऊन अनेक कहाण्या रंगवून सांगण्यात येतात. मात्र ते सर्व तर्क आहेत. 

ठोस माहिती कोणीच सांगत नाही. भाजपच्या काही मोजक्या आणि बड्या नेत्यांनाच ते माहीत असावे. त्याशिवाय कोणाला माहीत असले तरी कोणी उघडपणे बोलण्याचे धाडस करीत नाही. मध्यंतरी भाजपने शहरअध्यक्ष प्रवीण दटके यांना विधान परिषदेत पाठविले. त्यावेळीसुद्धा बावनकुळे यांच्या नावाची चर्चा होती. त्या संदर्भात दिल्ली वाऱ्याही त्यांनी केल्या होत्या. मात्र वरिष्ठांनी फुली मारली. भाजपची सत्ता नसल्याने राज्यपाल नियुक्त कोट्यांमध्येही त्यांचा समावेश होणे अवघड आहे. 

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार गिरीष व्यास यांची जागा रिक्त होत आहे. ते बिनविरोध निवडून आले होते. यावेळी निवडणूक होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा परिषद भाजपने गमावली आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात भाजपचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यामुळे ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला सर्वच दृष्टीने ‘तगडा’ उमेदवार द्यावा लागणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास बावनकुळे यांना उमेदवारी मिळवणे आणखीच अवघड ठरेल, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in